scorecardresearch

WPL 2023: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्स आणि मिताली राजने धरला ठेका, पाहा मजेदार VIDEO

Gujarat Giants Viral Video: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मिताली राज डानस करताना दिसत आहे.

WPL 2023 Updates Gujarat Giants Video
गुजरात जायंट्स (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Women’s Premier League 2023: महिला प्रीमियर लीग (2023) च्या पहिल्या सत्रासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, ज्यासाठी खेळाडूंसह चाहतेही खूप उत्सुक आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना ४ जानेवारीला खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत.

अशात गुजरात जायंट्स संघाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याची सध्या चर्चा आहे.गुजरात जायंट्स संघाची मार्गदर्शक आणि सल्लागार माजी भारतीय खेळाडू मिताली राजने खेळाडूंसोबत डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिताली राजची गुजरातस्थित फ्रँचायझीने महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी त्यांच्या संघाची मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. मिताली भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गजांपैकी एक आहे. ती संघाची कर्णधारही राहिली आहे. अशा स्थितीत त्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा गुजरात संघाला मिळणार आहे.

सीझन सुरू होण्यापूर्वी, फ्रँचायझीने मितालीचा एक डान्स व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे. ज्यामध्ये शबनम शकील आणि हर्ले गाला देखील तिच्या मागे नाचताना दिसत आहेत. तिघेही श्रीलंकेतील प्रसिद्ध गाणे ‘मानिक मागे हिते’वर डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: भारतीय फिरकीपटूंवर हरभजन सिंगचा संताप; म्हणाला, ‘जर फिरकी गोलंदाजांनी…’

बेथ मुनीची गुजरात जायंट्सच्या कर्णधारपदी नियुक्ती –

उल्लेखनीय आहे की, गुजरातने ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज बेथ मुनीला डब्ल्यूपीएल २०२३ साठी संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. लिलावात मूनीला फ्रँचायझीने २ कोटींना विकत घेतले. त्याचबरोबर भारतीय संघाची अष्टपैलू स्नेह राणाची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गुजरात जायंट्सची कर्णधार बनल्यानंतर, बेथ मुनी म्हणाली, “२०२३ मधील ऐतिहासिक महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन हंगामात गुजरात जायंट्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. डब्ल्यूपीएलच्या पदार्पणाच्या मोसमात क्रिकेटचा एक मनोरंजक आणि प्रभावी ब्रँड सादर करण्यासाठी संघ लवकरच बॉल रोलिंग करण्यास उत्सुक आहे. जे आशेने आम्हाला ट्रॉफीकडे नेईल. स्नेह राणाला माझी उपकर्णधार आणि मिताली राज, रेचेल हेन्स आणि नुशीन अल खादीर हे संघाचे महत्त्वाचे भाग आहेत. हे खरोखरच विलक्षण असेल.”

हेही वाचा – तिहेरी उडीपटू ऐश्वर्यावर चार वर्षांची बंदी

गुजरात जायंट्सचा संघ –

बेथ मूनी (कर्णधार), स्नेह राणा (उप-कर्णधार), अॅशले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डायंड्रा डॉटिन, एस मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ले गाला , अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबमन शकील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 11:24 IST