WPL 2026 All Teams Updated Squad in Marathi: वुमन्स प्रीमियर लीग २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही स्पर्धा ९ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गतविजेते मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. पण, या मोठ्या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू अनुपस्थित राहणार आहेत. ज्यामुळे संघांनाही स्पर्धेदरम्यान या गोष्टीचा फटका बसणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेसाठी सर्व संघ कसे आहेत, जाणून घेऊया.
महिला प्रीमियर लीगमध्ये पाच संघ सहभागी होतात. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, युपी वॉरियर्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजराय जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स असे संघ आहेत. यंदाच्या स्पर्धेसाठी यापैकी तीन संघांचे कर्णधार बदलण्यात आले असून संघात इतरही नवीन बदल झाले आहेत. स्पर्धेच्या काही दिवस आधी अनेक स्टार खेळाडूंनी माघार घेतली आहे.
आरसीबी संघाची स्टार एलिस पेरीने यावर्षी महिला प्रीमियर लीगमधून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सची खेळाडू एनाबेल सदरलँड देखील वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचं सांगितलं आहे. यूपी वॉरियर्सची तारा नॉरिसही आगामी हंगामातून बाहेर झाली आहे आहे. दिल्लीने सदरलँडच्या जागी ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर एलाना किंगला संधी दिली आहे. दरम्यान, आरसीबीने पेरीच्या जागी वेगवान गोलंदाज व अष्टपैलू सायली सातघरेला संधी दिली आहे. याशिवाय, यूपीने नॉरिसच्या जागी ऑस्ट्रेलियन फलंदाजी अष्टपैलू चार्ली नॉटला संघाचा भाग बनवले आहे.
वुमन्स प्रीमियर लीगमधील सुधारित संघ
मुंबई इंडियन्स – कर्णधार हरमनप्रीत कौर
नताली सायव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर, हिली मॅथ्यूज, अमनजोत कौर, जी कमलिनी, अमेलिया केर, शबनम इस्माईल, संस्कृती गुप्ता, राहिला फिरदौस, सजीवन सजना, निकोल केरी, सायका इशाक, त्रिवेणी वशिष्ठ, पूनम खेमनार, मिली इलिंगवर्थ, नल्ला रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – कर्णधार स्मृती मानधना
स्मृती मानधना, ऋचा घोष, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वॉल, नादिन डी क्लार्क, राधा यादव, लॉरेन बेल, लिन्से स्मिथ, प्रेमा रावत, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, दयालन हेमलता, ग्रेस हॅरिस, गौतमी नाईक, प्रत्युषा कुमार
युपी वॉरियर्स – कर्णधार मेग लॅनिंग
श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, सोफी एकलस्टोन, मेग लॅनिंग, फिबी लिचफील्ड, किरण नवगिरे, हरलीन देओल, क्रांती गौड, आशा शोभना, डिआंड्रा डॉटिन, शिखा पांडे, क्लो ट्रायोन, शिप्रा गिरी, सिमरन शेख, चार्ली नॉट, सुमन मीना, गोंगाडी त्रिशा, प्रतिका रावल
दिल्ली कॅपिटल्स – जेमिमा रॉड्रीग्ज
जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलाना किंग, मारिझान काप, निकी प्रसाद, लॉरा वोल्वार्ड, चिनेल हेन्री, श्री चरणी, स्नेह राणा, लिझेल ली, दिया यादव, तान्या भाटिया, नंदिनी शर्मा, ममता माडीवाला, लुसी हॅमिल्टन, मीनू मनी.
गुजराय जायंट्स – कर्णधार ॲश्ले गार्डनर
ॲश्ले गार्डनर, बेथ मुनी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, भारती फुलमाली, तितास साधू, अनुष्का शर्मा, तनुजा कंवर, काश्वी गौतम, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, यास्तिका भाटिया, हॅप्पी कुमारी, शिवानी सिंग, राजेश्वरी गायकवाड, डॅनी व्याट
