DC vs GG, WPL 2026: महिला प्रीमियर लीग स्पर्धेत आणखी एक थरारक सामना पाहायला मिळाला. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लिजेल ली ने सलामीला फलंदाजी करताना ८६ धावांची खेळी केली. तर शेवटी वॉल्व्हडार्टने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत दिल्लीला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं. पण दिल्लीला हा सामना ४ धावांनी गमवावा लागला आहे.
[caption id="attachment_5631860" align="alignnone" width="670"]
Delhi Capitals vs Gujarat Giants Highlights: या सामन्यात गुजरात जायंट्सने दिल्लीवर दमदार विजय मिळवला आहे. [/caption]
DC vs GG Live: ६ चेंडूत ७ धावांची गरज अन् गुजरातने बाजी मारली! सोफी डिवाईनने सामना फिरवला
महिला प्रीमियर लीग स्पर्धेत आणखी एक थरारक सामना पाहायला मिळाला. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लिजेल ली ने सलामीला फलंदाजी करताना ८६ धावांची खेळी केली. तर शेवटी वॉल्व्हडार्टने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत दिल्लीला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं. पण दिल्लीला हा सामना ४ धावांनी गमवावा लागला आहे.
दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी ४२ चेंडूत ९७ धावांची गरज आहे.
DC vs GG Live: दिल्ली कॅपिटल्सला पहिला मोठा धक्का! शफाली वर्मा परतली माघारी
दिल्ली कॅपिटल्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा १४ धावा करत माघारी परतली आहे.
DC vs GG Live: गुजरातने पुन्हा एकदा उभारला २०० धावांचा डोंगर! दिल्लीसमोर ठेवलं मोठं आव्हान
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातही गुजरातने २०० हून अधिक धावा केल्या आहेत. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या आहेत.
DC vs GG Live: गुजरात जायंट्सला पहिला मोठा धक्का! श्री चरणीने घेतला भन्नाट कॅच
गुजरात जायंट्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. बेथ मूनीला बाद करण्यासाठी श्री चरणीने आपल्याच गोलंदाजीवर भन्नाट कॅच घेतला आहे.
DD vs GG Live: नवी मुंबईत सोफी डिवाईनचं वादळ! २५ चेंडूत झळकावलं दमदार अर्धशतक
सोफी डिवाईनने पहिल्या डावात फलंदाजी करताना अवघ्या २५ चेंडूत तुफानी अर्धशतकी खेळी केली आहे.
DC vs GG Live: गुजरात जायंट्सची दमदार सुरूवात!
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातने चांगली सुरूवात केली आहे. सुरूवातीच्या ३ षटकात या संघाने २८ धावा केल्या आहेत.
DC vs GG Live Score:दिल्लीचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
