DC vs MI Highlights: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला . या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १५४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून जेमिमाने अर्धशतकी खेळी केली आणि संघाला ७ गडी राखून दमदार विजय मिळवून दिला.

Live Updates

[caption id="attachment_5658164" align="alignnone" width="670"]mumbai indians Delhi Capitals vs Mumbai Indians : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स[/caption]

23:14 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live: दिल्लीचा दमदार विजय

महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला . या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १५४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून जेमिमाने अर्धशतकी खेळी केली आणि संघाला ७ गडी राखून दमदार विजय मिळवून दिला.

22:37 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live Score: दिल्लीला विजयासाठी ३० चेंडूत इतक्या धावांची गरज

दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयासाठी ३० चेंडूत ४३ धावांची गरज आहे.

21:59 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live Score: दिल्लीला पहिला धक्का

दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिला धक्का बसला आहे. शफाली वर्मा २९ धावा करून माघारी परतली आहे.

21:57 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live Score: दिल्लीची दमदार सुरूवात! शफाली- ली ची तुफान फटकेबाजी

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने दमदार सुरूवात केली आहे. दिल्लीने ७ षटकांअखेर ६१ धावा केल्या आहेत.

21:23 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live: मुंबईने दिल्लीसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १५४ धावा केल्या आहेत. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १५५ धावा करायच्या आहेत.

20:58 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live: मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ तंबूत! अमनजोत कौर स्वस्तात परतली माघारी

मुंबई इंडियन्सला पाचवा मोठा धक्का बसला आहे. अमनजोत कौर ३ धावा करून माघारी परतली आहे.

20:49 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live: हरमनप्रीत कौरचं अर्धशतक हुकलं, पण नेट सिव्हर ब्रंटने अर्धशतक झळकावून सावरला MI चा डाव

नेट सिव्हर ब्रंटने ३४ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

20:33 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live: मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा धक्का! हरमनप्रीत कौर परतली माघारी

मुंबईला सुरूवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर हरमनप्रीत कौरने डाव सावरला होता. पण ती ४१ धावा करत माघारी परतली आहे.

19:50 (IST) 20 Jan 2026

DC vs MI Live Score: मुंबई इंडियन्सला लागोपाठ दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

मुंबई इंडियन्सला लागोपाठ २ धक्के बसले आहेत. सजीवन सजनानंतर हेली मॅथ्यूज देखील बाद होऊन माघारी परतली आहे.

Delhi Capitals vs Mumbai Indians: पाहा दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स.