GG vs MI, WPL 2026 Match 19: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने पूर्ण जोर लावला. शेवटच्या षटकात मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी २६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरने नाबाद ८२ धावांची खेळी केली. पण मुंबईला हा सामना ११ धावांनी गमवावा लागला आहे.

Live Updates

GG vs MI Highlihts :  गुजरात जायंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स.

22:54 (IST) 30 Jan 2026

GG vs MI Live: हरमनप्रीत कौरची एकाकी झुंज व्यर्थ! गुजरातकडून मुंबईचा पहिल्यांदाच पराभव

हरमनप्रीत कौरने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण मुंबई इंडियन्सला हा सामना ११ धावांनी गमवावा लागला आहे.

22:36 (IST) 30 Jan 2026

GG vs MI Live: हरमनप्रीत कौरचं अर्धशतक

धावांचा पाठलाग करताना कर्णधार हरमनप्रीत कौरने ३४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

22:12 (IST) 30 Jan 2026

GG vs MI Live: मुंबई इंडियन्सला चौथा धक्का!

मुंबई इंडियन्सला चौथा मोठा धक्का बसला आहे. अमेलिया केर २० धावा करून माघारी परतली आहे.

21:51 (IST) 30 Jan 2026

GG vs MI Live: मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत; टॉप ३ फलंदाज तंबूत

मुंबई इंडियन्सचे टॉप ३ फलंदाज तंबूत परतले आहेत.

21:41 (IST) 30 Jan 2026

GG vs MI Live: मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का! हेली मॅथ्यूज स्वस्तात परतली माघारी

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला आहे. हेली मॅथ्यूज अवघ्या ६ धावा करून माघारी परतली आहे.

21:09 (IST) 30 Jan 2026

GG vs MI Live: गुजरातने मुंबई इंडिन्ससमोर जिंकण्यासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने २० षटकांअखेर ४ गडी बाद १६७ धावा केल्या आहेत. गुजरातकडून फलंदाजी करताना अॅशले गार्डनरने सर्वाधिक ४६ तर जॉर्जिया वेहरहॅमने नाबाद ४४ धावांची खेळी केली.

20:21 (IST) 30 Jan 2026

WPL 2026 live: नॅटने मिळवून दिली महत्त्वाची विकेट

नॅट स्किव्हर ब्रंटला ११वं षटक टाकण्यासाठी हरमनप्रीत कौरने पाचारण केलं आणि त्याने पहिल्याच चेंडूवर सोफी डिव्हाईनला झेलबाद करत मोठी विकेट मिळवून दिली.

20:20 (IST) 30 Jan 2026

MI vs GG Live: १० षटकांत गुजरातच्या किती धावा?

१० षटकांत गुजरातने २ बाद ७१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये सोफी डिव्हाईन व अनुष्का शर्मा यांनी ४८ धावांची भागीदारी रचली.

20:17 (IST) 30 Jan 2026
GG vs MI Live: मुंबईच्या खात्यात दुसरी विकेट

अमेलिया करने १०व्या षटकात अनुष्का शर्माला झेलबाद करत संघाला दुसरी महत्त्वाची विकेट मिळवून दिली. अनुष्का शर्माने ३१ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३३ धावा केल्या आहेत.

19:43 (IST) 30 Jan 2026

GG vs MI Live: सजीवन सजनाचा भन्नाट कॅच! गुजरात जायंट्सला पहिला मोठा धक्का

गुजरात जायंट्सला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला आहे. बेथ मूनीला अवघ्या ५ धावांवर बाद करण्यासाठी सजीवन सजनाने भन्नाट कॅच घेतला.

MI beat RCB by 15 Runs Natalie Sciver Brunt Hundred Healy Matthews Richa Ghosh 90 Runs WPL 2026

<strong>GG vs MI:गुजरात जायंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स. </strong>