Women’s Premier League (WPL) 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या स्पर्धेत पाच संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत. या सीझनपूर्वी महालिलाव झाल्याने संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तीन संघांनी तर कर्णधारही बदलले आहेत. दरम्यान या स्पर्धेचं वेळापत्रक कसं असणार आणि सामने किती वाजता सुरू होतील, ते लाईव्ह कुठे पाहायचे; हेही जाणून घेऊया.

नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे. या सीझनमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील. सुरूवातीचे ११ सामने नवी मुंबईत तर इतर ११ सामने, ज्यामध्ये एलिमिनेटर आणि फायनलसह वडोदरा येथे खेळवले जातील. अंतिम सामना ५ फेब्रुवारीला खेळवला जाईल. स्पर्धेत पहिल्यांदाच डबल हेडर सामने देखील असतील. जे १० आणि १७ जानेवारीला नवी मुंबईत खेळवले जातील.

नवी मुंबई आणि वडोदरामध्येच वुमन्स प्रीमियर लीगचे सामने खेळवले जातील, कारण इतर स्टेडियममध्ये टी-२० विश्वचषक आणि रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी जेमिमा रॉड्रीग्जच्या खांद्यावर असेल. तर मेग लॅनिंगला युपी वॉरियर्सच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर एश्ले गार्डनर गुजरात जायंट्स संघाची कर्णधार असेल. याशिवाय आरसीबीच्या स्टार खेळाडू एलिस पेरी व एनाबेल सदरलँड या वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेबाहेर झाल्या आहेत. यांच्या जागी संघांनी बदली खेळाडूंची घोषणा केली आहे.

WPL 2026 मधील सामने कुठे लाईव्ह पाहता येणार?

वुमन्स प्रीमियर लीग (WPL) २०२६ चे सामने भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहेत. तर जिओ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग केले जातील. WPL चे सर्व सामने हे संध्याकाळी ७.३० वाजता सुर होतील, तर ७ वाजता नाणेफेक होईल. स्पर्धेचं जेतेपद जिंकणाऱ्या संघाला ६ कोटी बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. तर रनर अप संघाला ३ कोटी प्राईज मनी असेल.

WPL सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

९ जानेवारी, मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, नवी मुंबई<br>१० जानेवारी, यूपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१० जानेवारी, मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
११ जानेवारी, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१२ जानेवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
१३ जानेवारी, मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१४ जानेवारी, यूपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
१५ जानेवारी, मुंबई इंडियन्स वि. यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
१६ जानेवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१७ जानेवारी, यूपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स, नवी मुंबई
१७ जानेवारी, दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, नवी मुंबई
१९ जानेवारी, गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
२० जानेवारी, दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, वडोदरा
२२ जानेवारी, गुजरात जायंट्स वि यूपी वॉरियर्स, वडोदरा
२४ जानेवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
२६ जानेवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, वडोदरा
२७ जानेवारी, गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
२९ जानेवारी, यूपी वॉरियर्स वि.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
३० जानेवारी, गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स, वडोदरा
१ फेब्रुवारी, दिल्ली कॅपिटल्स वि. यूपी वॉरियर्स, वडोदरा
३ फेब्रुवारी, एलिमिनेटर, वडोदरा
५ फेब्रुवारी, अंतिम सामना, वडोदरा

वुमन्स प्रीमियर लीगमधील संघ
मुंबई इंडियन्स

नताली सायव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर, हिली मॅथ्यूज, अमनजोत कौर, जी कमलिनी, अमेलिया केर, शबनम इस्माईल, संस्कृती गुप्ता, राहिला फिरदौस, सजीवन सजना, निकोल केरी, सायका इशाक, त्रिवेणी वशिष्ठ, पूनम खेमनार, मिली इलिंगवर्थ, नल्ला रेड्डी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

स्मृती मानधना, ऋचा घोष, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वॉल, नादिन डी क्लार्क, राधा यादव, लॉरेन बेल, लिन्से स्मिथ, प्रेमा रावत, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, दयालन हेमलता, ग्रेस हॅरिस, गौतमी नाईक, प्रत्युषा कुमार

युपी वॉरियर्स

श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, सोफी एकलस्टोन, मेग लॅनिंग, फिबी लिचफील्ड, किरण नवगिरे, हरलीन देओल, क्रांती गौड, आशा शोभना, डिआंड्रा डॉटिन, शिखा पांडे, क्लो ट्रायोन, शिप्रा गिरी, सिमरन शेख, चार्ली नॉट, सुमन मीना, गोंगाडी त्रिशा, प्रतिका रावल

दिल्ली कॅपिटल्स

जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलाना किंग, मारिझान काप, निकी प्रसाद, लॉरा वोल्वार्ड, चिनेल हेन्री, श्री चरणी, स्नेह राणा, लिझेल ली, दिया यादव, तान्या भाटिया, नंदिनी शर्मा, ममता माडीवाला, लुसी हॅमिल्टन, मीनू मनी.

गुजरात जायंट्स

ॲश्ले गार्डनर, बेथ मुनी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, भारती फुलमाली, तितास साधू, अनुष्का शर्मा, तनुजा कंवर, काश्वी गौतम, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, यास्तिका भाटिया, हॅप्पी कुमारी, शिवानी सिंग, राजेश्वरी गायकवाड, डॅनी व्याट