MI vs GG Live Scorecard Updates, WPL 2026: या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने १९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार अर्धशतकी खेळी केली. तिने नाबाद ७१ धावांची खेळी केली. तर निकोला कॅरीने नाबाद ३८ धावांची खेळी करून मुंबई इंडियन्सला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला. हा मुंबईचा या हंगामातील दुसरा विजय ठरला आहे. तर गुजरातचा पहिलाच पराभव ठरला आहे.
[caption id="attachment_5627872" align="alignnone" width="670"]
Mumbai Indians Women vs Gujarat Giants Highlights: महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.[/caption]
MI vs GG Live: मुंबईला सामना जिंकण्याची संधी! विजयासाठी ३ षटकात इतक्या धावांची गरज
मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १८ चेंडूत ३० धावा करायच्या आहेत.
MI vs GG Live: मुंबईला २ मोठे धक्के!
मुंबईला दुसरा मोठा धक्का बसला आहे. हेली मॅथ्यूज परतली माघारी.
MI vs GG Live: मुंबईला पहिला मोठा धक्का! जी कमलिनी परतली माघारी
मुंबई इंडियन्सची स्टार फलंदाज जी कमलीनी १३ धावा करत माघारी परतली आहे.
MI vs GG Live: मुंबईची दमदार सुरूवात!
मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली आहे.
MI vs GG Live : गुजरातने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जाटंट्सने २० षटकांअखेर ५ गडी बाद १९२ धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत.
MI vs GG Live: गुजरातचा निम्मा संघ तंबूत! आयुषी रिटायर्ड हर्ट होऊन परतली माघारी
गुजरातचा निम्मा संघ माघारी परतला आहे. आयुषी ११ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली आहे.
पहिल्या डावात फलंदाजी करताना गुजरातने १६ षटकात १३६ धावा केल्या आहेत.
MI vs GG Live Score: गुजरातला दुसरा धक्का
गुजरातला दुसरा मोठा धक्का बसला आहे. बेथ मुनी ३३ धावा करत माघारी परतली आहे.
MI vs GG Live: गुजरातला पहिला मोठा धक्का! सोफी डिवाईन परतली माघारी
गुजरातला पहिला मोठा धक्का बसला आहे. सोफी डिवाईन ८ धावा करत माघारी परतली आहे.
WPL 2026 MI vs GG Highlights: मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स सामन्याचे हायलाईट्स
