MI vs RCB, WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पूर्ण करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयी सलामी दिली आहे.
[caption id="attachment_5627872" align="alignnone" width="670"]
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Highlights: स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.[/caption]
MI vs RCB Live: निर्णायक क्षणी RCB ला सहावा धक्का! सामना जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सहावा धक्का बसला आहे. आता विजयासाठी २१ चेंडूत ३७ धावांची गरज आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील ५ प्रमुख फलंदाज माघारी परतले आहेत.
MI vs RCB Live: मुंबईने RCB समोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सुरू असेलल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ६ गडी बाद १५४ धावा केल्या आहेत. मुंबईकडून फलंदाजी करताना सजीवन सजनाने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर निकोला कॅरीने ४० आणि जी कमलिनीने ३२, हरमनप्रीत कौरने २० धावांची खेळी केली.
MI vs RCB Live: मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ तंबूत! सजीवन सजनाचं अर्धशतक थोडक्यात हुकलं
मुंबई इंडियन्सकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सजना सजीवनने ४५ धावांची दमदार खेळी केली.
MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सला चौधा मोठा धक्का! हरमनप्रीत कौर परतली माघारी
मुंबई इंडियन्सला लागोपाठ २ धक्के बसले आहे. जी कमलिनीनंतर हरमनप्रीत कौरदेखील माघारी परतली आहे.
MI vs RCB: मुंबईच्या ५० धावा पूर्ण
मुंबई इंडियन्सने ९ व्या षटकात २ गडी बाद ५० धावा पूर्ण केल्या आहेत.
MI vs RCB Live: मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का
या डावातील ५ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून मुंबई इंडियन्सने १ गडी बाद २१ धावा केल्या आहेत. अमेलिया केर अवघ्या ४ धावा करून माघारी परतली आहे.
MI vs RCB Live: सलामीच्या सामन्यात RCB चा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MI vs RCB Highlights, WPL 2026

