MI vs UPW, WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. सलग ३ पराभवांनंतर अखेर यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करून आपला पहिला विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबईचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांअखेर १६१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हरलिन देओलने दमदार अर्धशतकी खेळी केली. हा सामना यूपीने ११ चेंडू शिल्लक ठेवून जिंकला.

Live Updates

[caption id="attachment_5627872" align="alignnone" width="670"]mumbai indians Mumbai Indians vs UP Warriorz (MI vs UPW) : पाहा मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स सामन्याचे हायलाईट्स[/caption]

22:31 (IST) 15 Jan 2026

MI vs UPW Live Score: अखेर विकेट मिळाली! लिचफिल्ड परतली माघारी

यूपी वॉरियर्सला मोठा धक्का बसला आहे. फिबी लिचफिल्ड २५ धावा करून माघारी परतली आहे.

21:51 (IST) 15 Jan 2026

MI vs UPW Live Score: फलंदाजीनंतर गोलंदाजीतही सिव्हर ब्रंट चमकली! यूपी वॉरियर्सला दुसरा मोठा धक्का

यूपी वॉरियर्स संघाला धावांचा पाठलाग करताना दुसरा धक्का बसला आहे. किरण नवगिरे देखील बाद होऊन माघारी परतली आहे.

21:01 (IST) 15 Jan 2026

MI vs UPW Live: सिव्हर ब्रंटची तुफान फटकेबाजी! मुंबईने यूपीसमोर ठेवले इतक्या धावांचे आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ गडी बाद १६१ धावा केल्या आहेत. यूपीला हा सामना जिंकण्यासाठी १६२ धावा करायच्या आहेत.

20:46 (IST) 15 Jan 2026

MI vs UPW Live Score: सिव्हर ब्रंट- कॅरीची जोडी जमली! मुंबई इंडियन्स मजबूत स्थितीत

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. मुंबईने १८ व्या षटकात १३९ धावा केल्या आहेत.

20:26 (IST) 15 Jan 2026

MI vs UPW Live: हरमनप्रीत कौर परतली माघारी! क्लो ट्रायोनने घेतला अविश्वसनीय कॅच

गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर हरमनप्रीत कौर या डावात स्वस्तात माघारी परतली आहे. तिला बाद करण्यासाठी क्लो ट्रायोनने भन्नाट झेल घेतला आहे.

20:15 (IST) 15 Jan 2026

MI vs UPW Live: मुंबईला दुसरा धक्का! अमनजोत कौरनंतर जी कमिलीनीही परतली माघारी

मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला आहे. अमनजोत कौरनंतर जी कमिलीनीही माघारी परतली आहे. मुंबईने १० षटकांअखेर ५४ धावा केल्या आहेत.

19:16 (IST) 15 Jan 2026

MI vs UPW Live: यूपी वॉरियर्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! मुंबई इंडियन्स बॅटिंग करणार

या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने एकतर्फी विजयाची नोंद केली होती.

WPL 2026 MI vs UPW:  पाहा मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स सामन्याचे हायलाईट्स.