RCB vs GG, WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना राधा यादवने ६६ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ७ गडी बाद १८२ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या गोलंदाजांसमोर गुजरात जायंट्सचा डाव १५० धावांवर आटोपला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३२ धावांनी आपल्या नावावर केला.

या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १८२ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीला आलेल्या ग्रेस हॅरिसने १७ धावांची खेळी केली. तर राधा यादवने ४७ चेंडूंचा सामना करत ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तर ऋचा घोषने २८ चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या १८३ धावांचा पाठलाग करताना बेथ मुनी सलामीला फलंदाजी करताना २७ धावा केल्या. तर कनिका आहुजाने १६ धावा केल्या. तर ॲशले गार्डनर अवघ्या ३ धावा करत माघारी परतली. गुजरात जायंट्सकडून फलंदाजी करताना भारती फुलमलीने एकाकी झुंज दिली. ती अवघ्या ३९ धावा करत माघारी परतली.

श्रेयांका पाटीलची दमदार गोलंदाजी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून गोलंदाजी करताना श्रेयांका पाटीलने दमदार गोलंदाजी केली. १८३ धावांचा बचाव करताना लॉरेन बेलने ३ गडी बाद केले. तर श्रेयांका पाटीलने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर अरुंधती रेड्डी आणि नदीन डी क्लार्कने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.