RCB vs UPW, WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली आहे. धावांचा पाठलाग करताना ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधनाने तुफान फटकेबाजी केली.
[caption id="attachment_5631809" align="alignnone" width="618"]
Royal Challengers Bengaluru vs UP Warriorz Highlights: महिला प्रीमियर लीग २०२६: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि यूपी वॉरियर्स हायलाईट्स [/caption]
UPW vs RCB: आरसीबीची 'रॉयल' फटकेबाजी! १४४ धावांचं आव्हान ९ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण; यूपी वॉरियर्सची दाणादाण
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली आहे. धावांचा पाठलाग करताना ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधनाने तुफान फटकेबाजी केली.
UPW vs RCB Live: ६,४,६,६,४.. ग्रेस हॅरिसकडून डॉटीनची धुलाई! RCBची विजयाच्या दिशेने वाटचाल
आरसीबीने धावांचा पाठलाग करताना ६ षटकात ७८ धावा केल्या आहेत.
UPW vs RCB Live Score: आरसीबीची दमदार सुरूवात! हॅरिस अन् स्मृतीची तुफान फटकेबाजी
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीने दमदार सुरूवात केली आहे. हॅरिस आणि स्मृतीच्या जोडीने ४ षटकात ३९ धावा जोडल्या आहेत.
UPW vs RCB Live Score: दीप्ती शर्मा अन् डॉटीनची दमदार खेळी! यूपीने RCB समोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने ५ गडी बाद १४३ धावा केल्या आहेत. आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी १४४ धावा करायच्या आहेत.
UPW vs RCB Live Score: यूपीच्या १०० धावा पूर्ण
यूपी वॉरियर्सने १६ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.
UPW vs RCB Live Score: यूपी वॉरियर्सला चौथा धक्का! किरण नवगिरे परतली माघारी
यूपी वॉरियर्सला लागोपाठ मोठे धक्के बसले आहेत. किरण नवगिरे ५ धावांवर माघारी परतली आहे.
UPW vs RCB Live Score: फिबी लिचफिल्ड परतली माघारी
श्रेयांका पाटिलने एकाच षटकात यूपीला दुसरा धक्का दिला आहे. लिचफिल्ड देखील स्वस्तात माघारी परतली आहे.
UPW vs RCB Live Score: राधा यादवने डाईव्ह मारून घेतला भन्नाट कॅच! मेग लेनिंग परतली माघारी
श्रेयांका पाटिलच्या गोलंदाजीवर राधा यादवने डाईव्ह मारून मेग लेनिंगचा भन्नाट झेल घेतला. ती १४ धावा करत माघारी परतली.
यूपी वॉरियर्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. लॉरेन बेलच्या गोलंदाजीवर हरलिन देओल ११ धावा करून माघारी परतली आहे.
WPL 2026 Royal Challengers Bengaluru vs UP Warriorz Highlights
