दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान महिला क्रिकेटचे चित्र बदलणार आहे. आज मुंबईत महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल. महिलांच्या आयपीएल लिलावात एकूण ४०९ खेळाडू आपले नशीब आजमावतील. या लिलाव प्रक्रियेला दुपारी २:३० वाजता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरुवात होईल.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, यूपी वॉरियर्स असे पाच संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. खेळाडंना खरेदी करण्यासाठी, सर्व ५ फ्रँचायझींकडे एकूण ६० कोटी रुपये आहेत. अशात स्मृती मंधाना आणि हरमन कौर व्यतिरिक्त इतर दोन खेळाडूंनाही लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.महिला आयपीएल पुढील महिन्यात ४ ते २६ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

महिलांच्या आयपीएल लिलावात सर्वोच्च आधारभूत किंमत ५० लाख रुपये आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्याशिवाय आणखी ८ भारतीय खेळाडूंचा या आधारभूत किंमत यादीत समावेश आहे. ५० लाखांच्या मूळ किमतीत एकूण २४ खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना लिलावात खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघ आग्रही असेल.

स्मृती मंधाना –

भारतीय टी-२० संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना महिला आयपीएलच्या पाचही फ्रँचायझींच्या रडारवर असेल. कारण ती अनेक भूमिका साकारू शकते. ती फलंदाजीसोबतच कर्णधारपदही करू शकते. ती जगभरातील महिला क्रिकेट लीगमध्ये खेळली आहे. यामध्ये बिग बॅश आणि वूमन हंड्रेडचा समावेश आहे. ती टी-२० फॉरमॅटची दमदार खेळाडू आहे. गेल्या वर्षी वूमन हंड्रेडमध्ये २०० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये मंधानाचा १५२ चा स्ट्राईक रेट हा दुसरा सर्वोत्तम ठरला. अशा परिस्थितीत लिलावात तिच्यावर पैशांचा पाऊस पडणार हे नक्की.

हरमनप्रीत कौर –

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारावर देखील प्रत्येक फ्रँचायझीची नजर असेल. मंधानाप्रमाणेच ती फलंदाजीसोबत कर्णधाराचीही भूमिका बजावू शकते. हरमनप्रीतने गेल्या वर्षभरात टी-२०मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. तिने टी-२० च्या २३ डावात ३८ च्या सरासरीने ६३७ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, वनडेमध्ये या कालावधीत, भारतीय कर्णधाराने १५ डावांमध्ये ६२ च्या सरासरीने ७४४ धावा केल्या. अशा स्थितीत तिला लिलावात मोठी रक्कम मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीबद्दल घेतला मोठा निर्णय; धर्मशाळा ऐवजी ‘या’ ठिकाणी होणार तिसरा सामना

शफाली वर्मा –

टीम इंडियाच्या या युवा फलंदाजाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच अंडर-१९ टी-२० विश्वचषक जिंकला आहे. स्पर्धेत शफालीच्या बॅटमधून धावांचा वर्षाव झाला. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये तिने ७ सामन्यात १९३ च्या स्ट्राईक रेटने १७१ धावा केल्या. ती तरुण असल्याने संघांना टी-२० मध्ये युवा खेळाडूंवर बोली लावायला आवडते. अशा परिस्थितीत शफालीला लिलावात भरघोस रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – WPL Auction 2023: महिला प्रीमियर लीग लिलावात एक महिला असणार लिलावकर्ता! जाणून घ्या कोण आहे ‘ती’ महिला?

दीप्ती शर्मा –

गेल्या एक वर्षात भारतीय महिला क्रिकेट संघाची ही अष्टपैलू खेळाडूने टी-२० फॉरमॅटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. तिने २९ डावात १७ च्या सरासरीने ३७ बळी घेतले आहेत. विशेष बाब म्हणजे दीप्ती केवळ चांगली फिरकी गोलंदाजच नाही, तर मधल्या फळीतील चांगली फलंदाजही आहे. दीप्तीची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. फ्रँचायझी तिच्यावरही मोठी बोली लावू शकतात.