scorecardresearch

Premium

बजरंगची कांस्यकमाई ; जागतिक कुस्ती स्पर्धेतील विक्रमी चौथे पदक

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया
भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया

बेलग्रेड : भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रविवारी कांस्यपदकाची कमाई केली.

बजरंगने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिव्हेरावर ११-९ अशी सरशी साधली. बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील चौथे पदक ठरले आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे. बजरंगने यापूर्वी २०१३मध्ये बुडापेस्ट आणि २०१९मध्ये नूर-सुलतान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य, तर २०१८मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

Ojas Deotale of Nagpur
नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक
Asian games 2023: Indian archers target gold in Asian Games Brilliant performance by Jyoti Aditi and Praneet
Asian games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद! ज्योती, अदिती आणि प्रनीतची शानदार कामगिरी
India won two more medals in athletics Karthik won silver and Gulveer won bronze in 10000-meter race
Asian Games: हांगझाऊ मध्ये भारताची शानदार कामगिरी सुरूच! अ‍ॅथलेटिक्समध्ये १०००० मीटर शर्यतीत कार्तिकने रौप्य तर गुलवीरने जिंकले कांस्यपदक
19th Asian Games in Hangzhou 2023
Asian Games: सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन दिआकोमिहालीसकडून बजरंगचा पराभव झाला. परंतु जॉनने अंतिम फेरी गाठल्याने बजरंगला रेपिचेजमधून संधी निर्माण झाली.

रेपिचेजमध्ये बजरंगने अर्मेनियाच्या वेझगेन तेव्हनयानवर ७-६ असा निसटता विजय मिळवत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला. मग रिव्हेराला ०-६ अशा पिछाडीनंतरही ११-९ अशा फरकाने नमवत त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली. यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे पदक ठरले. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटनेही कांस्यपदक पटकावले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wrestler bajrang punia won bronze medal in world wrestling championship zws

First published on: 19-09-2022 at 03:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×