छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. या प्रकरणी सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता. या अटकेनंतरही सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यंदाच्या आशिया कपबाबत ‘महत्त्वाची’ माहिती आली समोर

सुशील कुमारच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारने सुशील कुमारची डेप्युटेशन वाढविण्याची मागणी फेटाळली आहे. दिल्ली सरकारने त्याचा अर्ज फेटाळून लावला असून तो कार्यरत असलेल्या उत्तर रेल्वे विभागात पाठविला आहे. २०१५पासून सुशील दिल्ली सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होता आणि त्याचा कार्यकाळ २०२०पर्यंत वाढविण्यात आला होता. यावर्षीही हा कार्यकाळ वाढवायचा होता. सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणामुळे त्याची नोकरी जाऊ शकते, असे एका सूत्राने सांगितले आहे.

 

 

उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुशील कुमारला दिल्ली सरकारने छत्रसाल स्टेडियमवर ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्त केले होते. छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला होता.

‘‘आता शूज चिकटवायची गरज नाही”, क्रिकेटपटूच्या विनंतीनंतर ‘ही’ कंपनी मदतीला धावली