scorecardresearch

Premium

WTC Final: ‘गब्बर’ अन् ‘द युनिव्हर्सल बॉस’ स्टेडियममध्ये पोहोचताच गांगुलीची मजेशीर कमेंट; म्हणतो, “जखमी खेळाडूंना पर्याय…”

India vs Australia, WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पाहण्यासाठी शिखर धवन, ख्रिस गेल आणि सौरव गांगुली यांसारखी अनेक मोठी खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचली आहेत. गेलने रोहित शर्माचे कौतुक देखील केले.

WTC Final: Shikhar Dhawan and Chris Gayle reached the Oval Sourav Ganguly said If someone is injured they can play
टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हसताना दिसत आहेत. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

WTC 2023 Final India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. ओव्हलच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. त्याचवेळी हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज ओव्हलच्या मैदानावर पोहोचले. या दिग्गजांच्या यादीत शिखर धवन, ख्रिस गेल आणि सौरव गांगुली यांसारख्या नावांचा समावेश आहे. याशिवाय भारताचे माजी खेळाडू कपिल देव आणि अनिल कुंबळे देखील टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. मात्र, या दिग्गजांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शिखर धवन आणि ख्रिस गेलसह अनेक दिग्गज स्टेडियममध्ये उपस्थित होते

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हसताना दिसत आहेत. वास्तविक, युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलची फॅन फॉलोइंग भारतात पुरेशी आहे. तर शिखर धवन नुकताच आयपीएलमध्ये दिसला होता. शिखर धवनने आयपीएल २०२३च्या हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व केले. मात्र, ख्रिस गेलने आयपीएलला अलविदा केला आहे. या हंगामात ख्रिस गेल आयपीएलमध्ये समालोचक म्हणून दिसला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त ख्रिस गेल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

सौरव गांगुली प्रदीर्घ काळानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परतला

सौरव गांगुलीबद्दल बोलायचे झाले तर तो बऱ्याच काळानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परतला आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमवेत त्याने समालोचनही केले. BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गांगुली आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) मध्ये सामील झाला. तो संघाचा मार्गदर्शक आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी यंदाच्या मोसमात चांगली नव्हती. गुणतालिकेत संघ ९व्या क्रमांकावर होता.

यादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने स्टार स्पोर्ट्स हिंदीवर कमेंट करताना एक मजेशीर कमेंट केली. तो म्हणाला की, “संघातील कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास धवन खेळण्यासाठी खाली येऊ शकतो.” महत्त्वाचे म्हणजे, शिखर धवन आयपीएल २०२३मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता. तो टीम इंडियातून बाहेर पडत आहे. गेल तिथे कॉमेंट्री करत होता.

हेही वाचा: WTC Final 2023: “आमच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज पण…”, विराट कोहलीने स्मिथविषयी केले मोठे विधान, पाहा Video

सामन्यादरम्यान रोहित शर्माचे ख्रिस गेलने केले कौतुक

सामन्यादरम्यान भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंचे त्याने भरभरून कौतुक केले. आयसीसीशी संवाद साधताना तो म्हणाला की, “द हिटमॅन, रोहित शर्मा माझ्याकडे असलेल्या सिक्स मारण्याच्या क्षमतेच्या सर्वात जवळ आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे, तो खेळाचा एक लीजेंड आहे.” यावेळी पुढे बोलताना त्याने पांड्याचे देखील कौतुक केले. तो म्हणाला की, “हार्दिक पांड्या हा सध्याचा सर्वात सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याच्या सूटमध्ये विराट कोहली एकदम सज्जन दिसतो.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wtc 2022 final many veterans including dhawan gayle arrived to watch the world test championship final see photos avw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×