WTC 2023 Final India vs Australia: भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल चांगलाच फॉर्मात आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये देशासाठी जबरदस्त करत आहे. त्याने आयपीएल २०२३ मध्येही शानदार फलंदाजी केली आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यादरम्यान त्याने तीन शतके झळकावली. आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दरम्यान, शुबमनबद्दल अंतिम सामन्याशी संबंधित खेळाडूंकडून मतं घेण्यात आली आणि सर्वांनी शुबमन गिलला एवढा मोठा फलंदाज का मानलं जातं हे सांगितलं. आयसीसीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडूंनी गिलबद्दल आपले मत मांडले आहे.

या व्हिडिओमध्ये खुद्द शुबमन गिलने सांगितले की, “त्याच्या वडिलांना क्रिकेट आवडते. याच कारणामुळे वयाच्या अवघ्या तीनव्या वर्षी त्याने बॅट हातात घेतली. त्यानंतर त्याने प्लास्टिक बॉलने सराव सुरू केला आणि कालांतराने तो एक चांगला खेळाडू बनला.” त्याचवेळी रोहित शर्मा म्हणाला की, “गिलमध्ये मोठा खेळाडू बनण्याची पूर्ण क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत.”

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
Mayank Yadav for bowling record 155 point 8 kmph against PBKS
Mayank Yadav : ‘… कुठे लपला होतास’, माजी दिग्गज डेल स्टेनकडून भारताच्या युवा वेगवान गोलंदाजाचे कौतुक

विराट कोहली म्हणाला की, “गिल हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे आणि कोहली स्वतः त्याला विकसित करण्यासाठी खूप प्रयत्न करतो. कोहलीने सांगितले की, तो नेहमीच गिलला समजावत असतो. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येत असल्याचे त्यांना सांगितले जाते. जेणेकरुन गिल स्वतःला आगामी काळासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करू शकेल.”

https://www.worldtestchampionship.com/video/3532103?s=08

मोहम्मद सिराज म्हणाला की, “गिल आगामी काळात मोठा खेळाडू होईल, असे मी आधीच सांगितले होते. कारण, सिराजच्या ज्या बाऊन्सरवर सर्व फलंदाजांना त्रास होतो, तोच बाऊन्सर गिल मिड-विकेटमध्ये सहजपणे पुढच्या पायावरून खेचतो.” शुबमन गिल कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या फायनलमध्येही भारताकडून खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध डावाची सुरुवात करताना त्याने पहिल्या डावात २८ आणि दुसऱ्या डावात आठ धावा केल्या.

हेही वाचा: Delhi Capitals: दिल्ली करणार रिकी पाँटिंगची हकालपट्टी! खराब कामगिरीनंतर संघात मोठे बदल, ‘या’ भारतीय खेळाडूकडे प्रशिक्षकपदाची धुरा

सामन्यात काय झाले?

ओव्हल मैदानावर चौथ्या दिवशी लंच आधीच झाले आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून २०१ धावा केल्या आहेत. अॅलेक्स कॅरी ४१ आणि मिचेल स्टार्क ११ धावा करत खेळत आहे. ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ३७४ धावांची झाली आहे. आता भारतासमोरील अडचणी वाढत आहेत. उर्वरित विकेट्स लवकरात लवकर काढून टीम इंडियाला ४००च्या खाली विजयाचे लक्ष्य कसे राहील यासाठी प्रयत्न करायचे आहे. ४०० पेक्षा जास्त लक्ष्य गाठले तर भारतासाठी विजय खूप कठीण होईल. ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत ३०० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही.