WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात २९६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे १७३ धावांची आघाडी आहे. रहाणे-शार्दुलच्या अर्धशतकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने कमबॅक केले. मात्र, तरीही टीम इंडिया मागे आहे. असे असूनही कांगारूंना २०वर्ष जुना पराभव आठवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर ४६९ धावा उभ्या केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ५ बाद १५१ धावा केल्या होत्या. भारत ३१८ धावांनी पिछाडीवर होता. आता तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताने पहिल्या डावात २९६ धावा केल्या. या लढतीत टीम इंडिया सध्या बॅकफुटवर दिसत आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या गटात तसेच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांना वाटत आहे की भारत ही हा ट्रॉफी गमावेल. पण टीम इंडियाचा इतिहास मात्र काही वेगळेच सांगतो.

हेही वाचा: WTC Final 2023: ट्रॅव्हिसच्या शतकावरून भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध, काय आहे हेडच्या बॅटचे पाक कनेक्शन? पाहा Video

भारतीय संघाला अ‍ॅडलेडची जादू दाखवावी लागणार आहे

आज तिसऱ्या दिवशी (९ जून) भारतीय संघ १५१ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात करेल. आता टीम इंडियाला इथून हा सामना जिंकायचा असेल, तर तिला २० वर्ष जुन्या जादूची पुनरावृत्ती करावी लागेल. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धही ही जादू केली होती. खरं तर, आम्ही बोलत आहोत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००३च्या उत्तरार्धात झालेल्या कसोटी मालिकेबद्दल. त्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना अ‍ॅडलेड येथे १२ ते १६ डिसेंबर दरम्यान खेळला गेला. त्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. टीम इंडियाकडून फिरकीपटू अनिल कुंबळेने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

द्रविड आणि लक्ष्मणने अ‍ॅडलेडमध्ये शानदार कामगिरी केली

परंतु त्या सामन्यात भारतीय संघानेही पहिल्या डावात ५२३ धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी पहिल्या डावात राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अप्रतिम फलंदाजी दाखवली. त्यानंतर द्रविडने क्रमांक-३वर फलंदाजी करताना २३३ धावांची खेळी केली. लक्ष्मण सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने १४८ धावा केल्या.

हेही वाचा: WTC Final 2023: पाजी तुस्सी ग्रेट हो! चक्क गुडघ्यावर बसून हरभजनने अशी काही कृती केली की चाहते ही झाले खुश, पाहा Video

आगरकरने ६ विकेट्स घेत खेळाला कलाटणी दिली, जरी टीम इंडिया पहिल्या डावात २३ धावांनी मागे होती, परंतु त्यांनी दुसऱ्या डावात दमदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन संघाला १९६ धावांत गुंडाळले. अशाप्रकारे त्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २३० धावांचे लक्ष्य मिळाले. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज अजित आगरकरने दुसऱ्या डावात भारतीय संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने ६ गडी गमावून २३३ धावा केल्या आणि सामना ४ गडी राखून जिंकला. अशा परिस्थितीत भारतीय संघाला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाजी मारायची असेल, तर तीच अ‍ॅडलेड कसोटीची जादू दाखवावी लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final 2023 australian fear team india despite being in good condition a 20 year old defeat is being discussed avw
First published on: 09-06-2023 at 20:55 IST