scorecardresearch

WTC Final: यावेळीही WTC जिंकण्याचं टीम इंडियाच स्वप्न स्वप्नचं राहणार? ब्रेट लीच्या दाव्याने वाढवली धाकधूक

WTC Final and ICC Cricket World Cup 2023: ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट लीने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या विजेत्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

WTC Final 2023: Which team will win the WTC Final and ODI World Cup 2023? Brett Lee made a big prediction
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

WTC Final and ICC Cricket World Cup 2023: हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी आणि प्रत्येक संघासाठी खूप खास आहे. या वर्षी दोन चमकदार आयसीसी ट्रॉफी पणाला लागतील आणि त्या दोन्ही जिंकण्याची भारताला सुवर्ण संधी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ९ जून २०२३ पासून खेळवला जाईल. त्याच वेळी, ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक २०२३चे आयोजन केले जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत, तर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये अजून बराच वेळ शिल्लक आहे, पण आतापासून अनेक तज्ज्ञांकडून अंदाज बांधले जात आहेत. या एपिसोडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने सांगितले आहे की, त्यांच्या मते, कोणता संघ यावर्षी वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणार आहे.

हेही वाचा: Shastri On Dravid: वर्ल्डकप आधीच राहुल द्रविडची विकेट पडणार? रवी शास्त्रींचे सूचक विधान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कोणता संघ जिंकेल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. ९ जून २०२३ पासून दोन्ही संघांमध्ये निकराची लढत होणार आहे. स्पोर्ट्सयारीवरील डब्ल्यूटीसी फायनलबद्दल विचारले असता, लीने पटकन उत्तर दिले, “ऑस्ट्रेलिया जिंकेल.” तो पुढे म्हणाला की “भारत चांगला संघ आहे, परंतु सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर आहे.”

२०२३चा एकदिवसीय विश्वचषक कोण जिंकणार?

एकदिवसीय विश्वचषक २०२३ ऑक्टोबरमध्ये भारतात आयोजित केला जाणार आहे. एका मुलाखतीत ब्रेट ली ला कोण होणार विजेता? असे विचारले असता तो म्हणाला, “विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करणे कठीण होईल. भारताला येथील परिस्थिती चांगली माहीत आहे, त्यामुळे मला वाटते की भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियात खूप नवीन खेळाडू आले असून त्याच्याकडे गुणवत्ता अधिक आहे. त्यामुळे मुख्य खेळाडू जरी नसले तरी देखील भारताला कमी लेखून अजिबात चालणार नाही.”

हेही वाचा: Michael Vaughan On Indian Cricket: “भारत नाही तर ‘हा’ संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार”, मायकेल वॉनचे मोठे विधान!

नुकत्याच खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ असा विजय मिळवला. या कसोटी मालिकेदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणारे दोन्ही संघ देखील ठरले. आधी ऑस्ट्रेलिया आणि त्यापाठोपाट भारताने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी आपले स्थान पक्के केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ७ ते ११ जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरीकडे आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये आयोजित केला गेला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 18:48 IST

संबंधित बातम्या