India vs Australia, WTC 2023 Final: भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले सध्या लंडनमध्ये आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ते कॉमेंट्रीसाठी आला होता. यादरम्यान हर्षा यांनी लंडनमध्ये अनुभवी फुटबॉल समालोचक पीटर ड्र्युरी यांची भेट घेतली. अनेक दशकांपासून भोगले आणि ड्र्युरी या दोघांनीही आपल्या आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. पीटर ड्र्युरी यांनी अनेक महत्त्वाच्या फुटबॉल सामन्यांवर संस्मरणीय कॉमेंट्री केली आहे. गतवर्षी विश्वचषकादरम्यान अर्जेंटिनाच्या सामन्यांमध्ये त्यांच्या कॉमेंट्रीने चाहत्यांचे मन जिंकले होते.

ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हर्षा भोगलेची कॉमेंट्री आवश्यक असते, त्याचप्रमाणे फुटबॉलच्या महत्त्वाच्या सामन्यात पीटर ड्र्युरींचा आवाज नसेल तर चाहत्यांना सामने बघत नाही. ड्र्युरींना सर्वोत्तम फुटबॉल समालोचक देखील म्हटले जाते. अलीकडेच, त्यांनी फुटबॉल युरोप लीग फायनल दरम्यान खुलासा केला होता की हर्षा भोगले हे त्यांचे आदर्श आहेत आणि ते लवकरच त्याला लंडनमध्ये भेटणार आहे.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

हर्षा भोगले यांनी छायाचित्र शेअर केले

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या मध्यावर हर्षा आणि पीटर ओव्हलवर भेटतात. दोघांमधील संवादाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पीटरसोबतचा एक फोटो शेअर करत हर्षाने लिहिले की, “किती सुंदर माणूस आहे. पीटर ड्र्युरी हे सर्वोच्च व्यावसायिक आहेत. त्यांच्याशी त्यांच्या कामाबद्दल बोलून खूप आनंद झाला.”

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून १२३ धावा केल्या आहेत. सध्या कॅमेरून ग्रीन सात आणि मार्नस लबुशेन ४१ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघ आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात १७३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात १२३ धावांची भर घातल्याने ऑस्ट्रेलियन संघाची एकूण आघाडी आतापर्यंत २९६ धावांची झाली आहे.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “…पूर्णपणे तयार नव्हती”, ओव्हल खेळपट्टीबाबत शार्दुल ठाकूरचे धक्कादायक विधान

सामन्यादरम्यान फिरकीपटू रविंद्र जडेजा दुसऱ्या डावात चांगल्या लयीत दिसत आहे. जडेजाने शुक्रवारी स्टीव स्मिथची विकेट घेताच मोठा विक्रम केला. रविंद्र जडेजाच्या फिरकीपुढे स्मिथ फारकाळ टिकू शकला नाही. ४७ चेंडूत ३४ धावा करून त्याने विकेट गमावली. या विकेटच्या जोरावर जडेजा स्मिथविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा दुसरा गोलंदाज बनला. त्याने तब्बल आठ वेळा स्मिथला मैदानाबाहेर धाडले आहे.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: मोहम्मद सिराजचा एक चेंडू अन् लाबुशेनची उडाली झोप, Video व्हायरल; चाहते म्हणाले, “घोड़े बेचकर सो रहे थे…”

कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज

९ – स्टुअर्ट ब्रॉड (२७ कसोटी)

८ – रवींद्र जडेजा (१३ कसोटी)

८ – रविचंद्रन अश्विन (१६ कसोटी)

८– जेम्स अँडरसन (२५ कसोटी)

७ – यासीर शाह (७ कसोटी)