WTC 2023 Final India vs Australia:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना बुधवारी तीन गड्यांच्या मोबदल्यात ३२७ धावा केल्या. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज फारसे दिसले नाहीत आणि २५ षटकांत पहिले तीन विकेट घेतल्यानंतर पुढच्या ६१ षटकांत एकही बळी घेता आला नाही. टीम इंडियाच्या खराब गोलंदाजीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “डब्ल्यूटीसी फायनलची परिस्थिती जाणून घेण्यासाठी भारताने सामन्यापूर्वी दोन सराव सामने खेळायला हवे होते. पूर्वतयारीच्या अभावामुळे भारताची ही अवस्था झाली आहे.”

रमीझ यांनी त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, “फक्त एका टेस्टवरून तुम्हाला काय करायचे आहे याचे आकलन करणे कठीण आहे. एक संघ उपमहाद्वीपीय परिस्थितीतून या थंड हवामानात येतो आणि त्याला कोणताही सराव सामना न खेळता पाच-सहा दिवसांत या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. मला याचेच फार आश्चर्य वाटले. ही WTC फायनल आहे, त्याआधी भारताने किमान इंटर-स्क्वॉड संघबरोबर सामने खेळायला हवे होते. तुम्ही तीन-चार एकदिवसीय सामने खेळलेत तरीही तुम्हाला परिस्थितीची सवय होते.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

रमीझ म्हणाला, “इंग्लंडमध्ये ढगाळ हवामान खेळपट्टीची स्थिती अगदी वेगळी आहे. तुम्हाला तेथील परिस्थितीची जुळवून द्यायचे आहे. गोलंदाजांनाही येथे त्यांची लाईन आणि लेंथ अ‍ॅडजेस्ट करणे आवश्यक आहे. आयपीएलमधील चार षटकांनंतर, तुम्हाला येथे एका दिवसात किमान १७-१७ षटके टाकावी लागतील. शरीरालाही विश्रांतीची गरज असते, आयपीएलमुळे भारतीय संघातील खेळाडू अशा परिस्थितीत फेल झाले आहेत. टीम इंडियाला फक्त या सामन्यात देवचं वाचवू शकतो.”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: हार्दिक फायनल का खेळत नाही? नासिर हुसेनच्या प्रश्नाला पंटरने असे उत्तर दिले की सगळेच झाले अवाक्

काय घडलं मॅचमध्ये?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघ प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन विकेट ७६ धावांत सोडल्या होत्या. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला (०) यष्टिरक्षक भरतकरवी झेलबाद केले. शार्दुल ठाकूरनेही डेव्हिड वॉर्नरला भरतकरवी झेलबाद केले. त्याला ४३ धावा करता आल्या. त्याचवेळी शमीने मार्नस लाबुशेनला क्लीन बोल्ड केले. त्याला २६ धावा करता आल्या.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “१०० कसोटींचा अनुभव असूनही अशा फुटकळ चुका करता…”, पुजाराच्या शॉट सिलेक्शनवर रवी शास्त्री संतापले

मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. हेड आणि स्मिथने चौथ्या विकेटसाठी २८५ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवशी स्मिथ १४६ आणि ९५ धावांवर नाबाद होता. आणि दुसऱ्या दिवशी, हेड त्याच्या डावात १७ धावा जोडून बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने १६३ धावांची खेळी केली. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने शतक पूर्ण केले.

Story img Loader