WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल २०२३) च्या फायनलमधील पहिल्या दिवसाचा खेळ झाला आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. काल भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या ७६ धावात ३ खेळाडूंना बाद करत चांगली सुरुवात केली होती, पण नंतर स्टीव्ह स्मिथ (१२१) आणि ट्रॅव्हिस हेड (१७४) ही जोडी जमली तेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज हतबल दिसत होते. यावर भारताचे माजी खेळाडू फारुख इंजिनिअर यांनी नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माच्या प्रथम क्षेत्ररक्षणाच्या निर्णयाने भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनिअर आश्चर्यचकित झाले. “ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्याच्या भीतीने हे घडले असावे”, असे ते म्हणाले. फारुख यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की, “भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली नाही कारण त्यांना भीती होती की ते ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांविरुद्ध उघडे पडतील. त्यांना त्यांच्या फलंदाजीवर विश्वास नव्हता.”

एएनआय या वृत्तसंस्थेशी चर्चा करताना फारुख इंजिनिअर यांनी ही माहिती दिली. आपल्या कोटवरील भारतीय तिरंगा बिल्ला दाखवत म्हणाले, “मी माझ्या भारत देशाच्या समर्थनासाठी येथे आलो आहे. भारताने येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण आमच्या फलंदाजांना ताज्या हिरव्या विकेटवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करायचा नव्हता.”

८५ वर्षीय माजी खेळाडूने सांगितले की, “मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे रोहित शर्माच्या संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत. याबरोबरच चेतेश्वर पुजारा भारतासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल तसेच, विराट कोहली आणि शुबमन गिलही चांगली कामगिरी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.”

भारतीय संघांची दुसऱ्या दिवशी दमदार गोलंदाजी

इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी तीन गडी गमावून ३२७ धावा केल्या होत्या. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर स्मिथने दोन चौकार मारून शतक ठोकले. या मैदानावरील त्याचे हे तिसरे शतक होते. स्मिथचे शतक होताच भारतीय गोलंदाजांना जोडी फोडण्यात यश आले. मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. ट्रॅव्हिस हेडने १७४ चेंडूत १६३ धावा केल्या. त्याच्या खेळीत २५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर मोहम्मद शमीने भारताला पाचवे यश मिळवून दिले आहे. त्याने कॅमेरून ग्रीनला दुसऱ्या स्लिपमध्ये शुबमन गिलकडे झेलबाद केले. ग्रीनने ७ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: विराट- रोहितसाठी चार वर्षांनी अनुष्का व रितिका एकत्र..WTC फायनलचा ‘तो’ फोटो पाहून फॅन्स म्हणतात, भांडण संपलं?

ग्रीन पाठोपाठ भारताचा ब्रेक थ्रू गोलंदाज शार्दूल ठाकूरने सेट फलंदाज स्टीव्ह स्मिथला १२१ धावांवर बाद केले. त्याने त्याच्या खेळीत तब्बल १९ चौकार लगावले. ४०२ धावांवर ऑस्ट्रेलियन संघाची सातवी विकेट पडली. मिचेल स्टार्क २० चेंडूत ५ धावा करून बाद झाला आहे. अक्षर पटेलच्या अचूक थ्रोने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता कर्णधार पॅट कमिन्स आणि अ‍ॅलेक्स कॅरी क्रीजवर असून दुसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने ४२२ धावा केल्या आहेत. भारताला लवकरात लवकर तीन विकेट्स घेणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final ind vs aus farooq engineer upset over rohits bowling decision says team india was scared avw
First published on: 08-06-2023 at 17:25 IST