scorecardresearch

Premium

WTC Final IND vs AUS: “…पूर्णपणे तयार नव्हती”, ओव्हल खेळपट्टीबाबत शार्दुल ठाकूरचे धक्कादायक विधान

WTC Final Pitch controversy: ज्या खेळपट्टीवर शार्दुल ठाकूरने दमदार अर्धशतक झळकावले त्याच खेळपट्टीवर त्याने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं काय म्हटला? जाणून घ्या.

WTC Final: So Was the Oval Pitch Not Ready for The Grand WTC final Match? Shardul Thakur raised questions
शार्दुल ठाकूरने ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सौजन्य- हॉटस्टार (ट्वीटर)

Shardul Thakur on WTC Final Pitch controversy: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शार्दुलच्या मते, ओव्हलची खेळपट्टी WTC फायनलसाठी पूर्णपणे तयार नाही. ही खेळपट्टी २०२१ मध्ये झालेल्या सामन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. माहितीसाठी की भारताने २०२१ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. त्यानंतर ओव्हलवर यजमान देशाचा १५७ धावांनी पराभव झाला आणि ओव्हलने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली.

आता प्रश्न असा येतो की शार्दुलने ज्या खेळपट्टीवर तब्बल तीन तास फलंदाजी केली, दमदार अर्धशतकही केले. त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी शतके झळकावली, मग ही खेळपट्टी डब्ल्यूटीसी फायनलसाठी तयार नव्हती असे का म्हणाला? जरी ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शार्दुलने अर्धशतक झळकावले तरीपण ही खेळपट्टी थोडी वेगळी आहे. यावर फलंदाजी करत असताना चेंडूच्या असमान उसळीमुळे त्याच्या हाताला दोनदा मार लागला. त्याने अजिंक्य रहाणेसोबत १०९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताला २९६ धावांपर्यंत नेले. कालही सिराजच्या गोलंदाजीवर लाबुशेन दोन ते तीनवेळा जखमी झाला यावरून आता अनेक चाहते आयसीसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: मोहम्मद सिराजचा एक चेंडू अन् लाबुशेनची उडाली झोप, Video व्हायरल; चाहते म्हणाले, “घोड़े बेचकर सो रहे थे…”

गेल्या वेळी ओव्हलमध्ये गोलंदाजांना खेळपट्टीने मदत केली- शार्दुल

लॉर्ड शार्दुल म्हणाला, “आताची खेळपट्टी खूप वेगळी दिसते. गेल्या वेळी जेव्हा आम्ही ओव्हलवर कसोटी खेळलो तेव्हा खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत होती. इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरण असेल तर चेंडू नक्कीच स्विंग होईल, हे सर्वांना माहीत होते. पूर्वी, खेळ पुढे जात असताना खेळपट्टी सपाट ठेवण्यासाठी संघ रोलर्सचा वापर करत होते. मात्र यावेळी तसे काही दिसत नाही. मला असे वाटते की खेळपट्टी सामन्यासाठी पूर्णपणे तयार नाही. जसे की असमान उसळी, कधी स्विंग होत नाही तर कधी कधी इतका होतो की वाईड जातो. हे दुसऱ्या दिवशी पाहिले. तिसऱ्या दिवशीही काही चेंडू वर जात होते तर काही खाली राहिले होते.”

भारतीय अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला, “गुड लेंथवर टप्प्यावरूनही अनेक चेंडू अधिक उसळी घेत होते तर काही खूपच खाली राहत होते. एका एंडकडून चेंडू अधिक वेगाने वर येत होता आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी त्याचा चांगला उपयोग केला. दुसऱ्या एंडला मात्र चेंडू खूप खाली राहत होता. एक दिवस आधीचा खेळ पाहिला तर खेळपट्टीचा मूड बदलला आहे, असे दिसते. चेंडू सोडायचा की खेळायचा हे ठरवण्यात फलंदाजांना त्रास होत होता. पण बहुतेक प्रसंगी सर्वांना शॉटसाठी जावे लागल्याचे पहिले.”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: किती ती घाई, किमान पंचांचा निर्णय तर बघा! भर मैदानात ऑस्ट्रेलियाचा झाला पचका, पाहा Video

शार्दुल ठाकूरने सांगितले की, “ऑस्ट्रेलिया २९६ धावांनी आघाडीवर असूनही भारत सामन्यात कायम आहे. तो कारण, क्रिकेट हा एक विचित्र खेळ आहे. तुम्ही कधीच सांगू शकत नाही की योग्य धावसंख्या काय आहे? विशेषतः आयसीसी फायनलमध्ये. दोन चांगल्या भागीदारी झाल्या की ४५० किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग करू शकता. गेल्या वर्षी इंग्लंडने येथे ४०० धावांचा पाठलाग केल्याचे आम्ही पाहिले आणि त्यांनी जास्त विकेट्सही गमावल्या नाहीत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wtc final it was not fully prepared shardul thakur gave a shocking opinion about the oval pitch avw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×