scorecardresearch

Premium

WTC Final: सामन्याच्या पहिल्याच दिवशी सिराज-लाबुशेन भिडले! चाहते म्हणतात, क्रिकेट सोडून WWE… Video व्हायरल

India vs Australia, WTC 2023 Final: मैदानावर सिराज भागीदारी तोडण्यासाठी सर्व युक्त्या अवलंबतो. तो स्विंगसह स्लेजिंगचा वापर करतो, तसेच काहीसे लाबुशेनच्या बाबतीतही त्याने केले. यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

WTC Final: Siraj- Labuschagne clash on the first day of the match Hilarious comments on Fans Video viral
सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

WTC 2023 Final India vs Australia: लंडनमध्ये ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने उस्मान ख्वाजाला बाद केले. याआधीही तो कांगारू संघासाठी सतत डोकेदुखी ठरला. सिराजच्या षटकातील एक चेंडू इतका धोकादायक होता की मार्नस लाबुशेन जखमी झाला, त्याच्या हातातून बॅट खाली पडली होती.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. कांगारू फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद करून सिराजला पहिले यश मिळाले. ख्वाजा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर लाबुशेन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन फलंदाजीला आला. त्याच्याशी सिराज भिडला त्यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. सिराज बॅट्समनला त्याच्या गोलंदाजी व्यतिरिक्त देखील इतर एका गोष्टीने सतत काही ना काही फलंदाजाच एकग्रता भंग करत असतो. तो स्लेजिंग आणि स्टॅरिंग करून फलंदाजाला नेहमीच सेट होऊ देत नाही.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

नेमका काय घडलं?

खरे तर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने डावातील ४०वे षटक सिराजकडे सोपवले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाबुशेन स्ट्राइकवर होता. सिराजने ताशी १४३ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला, तो लाबुशेनच्या अंगठ्याला लागला. लाबुशेनला चेंडू लागताच त्याच्या हातातून बॅट खाली पडली. हे पाहून ऑस्ट्रेलियन संघाचे फिजिओ मैदानावर पोहोचले. पण दुखापत फारशी गंभीर नव्हती. यामुळे तो पुन्हा खेळू लागला. यानंतर सिराज त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी थोडा संवाद साधला. त्यानंतर दोघे जवळ आले आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला, चाहते म्हणाले की, “हे क्रिकेट सोडून WWE आहे का? अशी मजेशीर चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.”  

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावून १७० धावा केल्या आहेत. उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने २८ षटकांत ९७ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. या सत्रात फक्त लाबुशेन बाद झाला. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शानदार फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. ट्रॅव्हिस हेडने ६० चेंडूत १४वे कसोटी अर्धशतक झळकावले. या दोघांनी चहापानापर्यंत चांगली फलंदाजी करत ९४ धावांची नाबाद भागीदारी केली. चहापानापर्यंत हेड ६० धावांवर तर स्मिथ ३३ धावांवर खेळत आहे. हीच वेळ होती जेव्हा टीम इंडियाला अश्विनची उणीव भासली.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनल कोण जिंकणार? वसीम अक्रमने केले भाकित; म्हणाला, “संयम ठेवला तर…”

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सायकलच्या (२०२१-२३) अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच ही ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघाला २०१३ नंतरची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकायची आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wtc final siraj teased labuschagne saying something fans said the fight has started avw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×