Ajinkya Rahane IND vs AUS WTC: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून १५१ धावा केल्या आहेत. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २६९ धावा म्हणजे आणखी ११८ धावा करायच्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावा आणि श्रीकर भरत ५ धावांवर नाबाद आहे.
भारताच्या फलंदाजांची फळी पाहिल्यास रहाणे हा भारताचा शेवटचा स्पेशलाइज्ड फलंदाज आहे आणि पहिल्या डावात फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला अजून ११९ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने कालच्या दिवसातच रहाणेला बाद केले असे वाटत होते. खेळाच्या अंतिम सत्रात २२ षटकात ४ बाद ८८ धावा झाल्या होत्या तेव्हा कमिन्सच्या चेंडूवर रहाणेची महत्त्वाची विकेट भारताने गमावल्याचे अंपायरने सुद्धा घोषित केले होते. पण केवळ विश्वासाच्या बळावर रहाणेने यावेळी डीआरएस घ्यायचे ठरवले आणि त्यात कमिन्सकडून झालेल्या एका चुकीमुळे रहाणेला जीवनदान मिळाले.




ICC ने हा व्हिडीओ शेअर करताना ‘ड्रामा’ असे कॅप्शन दिले आहे. तुम्हीही रिप्ले मध्ये पाहू शकता की जारो अंपायरने रहाणेला आउट घोषित केले असले तरी कमिन्सने प्रत्यक्षात ओव्हर-स्टेप केले होते आणि चेंडू ‘नो-बॉल’ होता.
रहाणेसह टीम इंडियाला जीवनदान, महत्त्वाचा DRS Video
हे ही वाचा<< IND vs AUS साठी स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार नाही तर ‘या’ चॅनेलवर मोफत पहा सामना; ICC ची फायनलसाठी घोषणा
दरम्यान, भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा १५ धावा, शुबमन गिल १३ धावा, चेतेश्वर पुजारा १४ धावा, विराट कोहली १४ धावा करून बाद झाला. ७१ धावांपर्यंत भारताने चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर रवींद्र जडेजा आणि रहाणेने पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. जडेजाने ऑफस्पिनर नॅथन लायनने स्लिपमध्ये झेलबाद केले. त्याला ४८ धावा करता आल्या होत्या. अशावेळी आता रहाणेला मिळालेले जीवनदान भारतासाठी आशेचा किरण ठरला आहे.