WTC Points Table Update After Melbourne Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाला १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे. आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर WTC फायनलच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. एका दिवसापूर्वीच दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव करून WTC च्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते. दक्षिण आफ्रिकेची टक्केवारी आता ६६.८९ आहे. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ५८.८९ होती, तो आता ६१.४६ झाला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाने मोठी झेप घेतली आहे. यानंतरही संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकला नसला तरी अंतिम फेरी गाठण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसत आहे.

हेही वाचा –“विराट खेळत राहील पण रोहित…”, रवी शास्त्रींचं विराट-रोहितच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य, कर्णधाराबद्दल स्पष्टच बोलताना म्हणाले…

मेलबर्न कसोटी १८४ धावांनी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असला तरी ऑस्ट्रेलियाच्या गुणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे आता ६१.४५ गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठण्यासाठी जोरदार दावा ठोकला आहे. मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाची टक्केवारी ५५.८८ होता, जो आता ५२.७७ वर आला आहे. म्हणजेच भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. आता फायनलचा मार्ग त्यांच्यासाठी बंद झाला नसला तरी हा मार्ग खूपच कठीण आहे. भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार की नाही आता भारताच्या हातात राहिलेले नाही. इतर संघांच्या सामन्याच्या निकालावर याचा निर्णय असेल.

हेही वाचा – IND vs AUS: मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने मारली बाजी; शेवटच्या तासाभरात भारताने गमावल्या ७ विकेट्स

मेलबर्न कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडिया अजूनही गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे पण भारताचे गुण कमी झाले आहेत. आता टीम इंडियाच्या नजरा सिडनीत होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यावर असणार आहेत. टीम इंडियासाठी आता हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचे झालं आहे. जर टीम इंडियाने सिडनी कसोटी गमावली किंवा सामना अनिर्णित राहिला तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जैस्वाल आऊट की नॉट आऊट? तिसर्‍या पंचांच्या निर्णयावरून मतमतांतरं; पुन्हा एकदा भारताविरूद्ध चुकीचा निर्णय?

मालिकेतील शेवटचा सामना ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवला जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील भारतीय संघाचा हा शेवटचा सामना असेल. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेबरोबर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळताना दिसणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाचे तीन सामने बाकी आहेत, तर टीम इंडियाचा एकच सामना बाकी आहे. आता भारताची समीकरणं बिघडली असून पुढील वर्षी होणारी WTC फायनल दक्षिण आफ्रिका विरूद्ध कोण खेळणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

Story img Loader