WTC Points Table Changes After South Africa Test Series Win: गेल्या एका महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बरेच बदल झाले आहेत. आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या मलिका विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांगलादेशविरूद्ध मालिकेतील दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरीच्या शर्यतीत पुढे आले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे न्यूझीलंड संघाचे निश्चितच नुकसान झाले आहे. ज्यामध्ये ते आता पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

आफ्रिकन संघाने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चट्टोग्रामच्या मैदानावर खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना अवघ्या तिसऱ्या दिवशी जिंकला. यात सघाने एक डाव आणि २७३ धावांनी विजय मिळवत मालिकाही नावे केली. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यासह त्यांची टक्केवारी ५४.१७ वर आली आहे.

IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Mukesh Kumar sensational 6 for 46 helps India A bowl Australia A out for 195 Runs INDA vs AUSA
INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले

हेही वाचा – Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील २ सामने आधीच जिंकलेल्या न्यूझीलंड संघाला फटका बसला असून संघ पाचव्या स्थानी घसरला आणि आता त्यांची टक्केवारी ५० टक्के आहे. याशिवाय बांगलादेशचा संघ क्लीन स्वीपचा सामना केल्यानंतर २७.५० गुणांच्या टक्केवारीसह ८व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघ अजूनही ६२.८० गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ ६२.5५० गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. अवघ्या काही गुणांनी पहिल्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला अपेक्षित अशी कामगिरी करावी लागणार आहे. भारताला पहिले स्थान कायम राखण्यासाठी किवी संघाविरुद्ध मुंबईत होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. जसप्रीत बुमराह आजारी असल्याने तो या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे मुंबईच्या मैदानावर गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ २२ नोव्हेंबरपासून घरच्या मैदानावर भारताविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Story img Loader