बुडापेस्ट टेबल टेनिस स्पर्धा : साथियन, मनिका उपउपांत्यपूर्व फेरीत

पुरुष एकेरीत साथियनने फ्रान्सच्या कॅन अक्कूझूचा ३-१ (१४-१२, ११-५, ७-११, ११-४) असा सहज पराभव केला,

बुडापेस्ट : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये छाप पाडणाऱ्या भारताच्या साथियन गुणशेखरन आणि मनिका बत्राने जागतिक टेबल टेनिस कंटेंडर बुडापेस्ट आंतरराष्ट्रीय स्पध्रेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

पुरुष एकेरीत साथियनने फ्रान्सच्या कॅन अक्कूझूचा ३-१ (१४-१२, ११-५, ७-११, ११-४) असा सहज पराभव केला, तर महिला एकेरीत मनिकाने जर्मनीच्या सबिना विंटरवर ३-२ (८-११, ११-७, ११-६, १५-१३, ११-५) अशी मात केली. पुढील फेरीत गुणशेखरन इटलीच्या नियागॉल स्टोयानोव्हशी, तर मनिका जॉर्निया पिक्कोलिनशी सामना करणार आहे.

हरमीत देसाईनेही पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे. त्याने हंगेरीच्या सीसाबा आंद्रासला ३-२ (६-११, ७-११, १३-११, ११-७, ११-४) अशा फरकाने नमवले. तसेच मान ठक्करने बेलारूसच्या पॅव्हेल प्लॅटानोव्हला ३-० (१२-१०, ११-९, ११-६) असे नामोहरम केले.

महिलांमध्ये अर्चना कामतने दुसरी फेरी गाठताना रशियाच्या याना नोस्कोव्हावर ३-२ (११-८, ११-९, ६-११, ५-११, ११-९) असा विजय मिळवला. श्रीजा अकुलाने स्वीडनच्या लिंडा बर्गस्टॉर्मला ३-२ (११-८, ६-११, १४-१२, २-११, ११-७) असे हरवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wtt contender budapest 2021 sathiyan and manika batra enter semi finals zws

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या