लास्को टेबल टेनिस स्पर्धा : मनिका-अर्चना यांना सुवर्ण

महिला एकेरीत मनिकाने कांस्य, तर मिश्र दुहेरीत अर्चनाने मानव ठक्करच्या साथीने कांस्यपदक जिंकले.

photo credit : twitter

लास्को : मनिका बत्रा आणि अर्चना कामत या भारतीय जोडीने रविवारी डब्ल्यूटीटी कंटेन्डर लास्को टेबल टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. मनिका-अर्चना जोडीने अंतिम फेरीत क्युबाच्या मेलानी आणि एड्रियाना या डियाज भगिनींवर ३-० (११-३, ११-८, १२-१०) अशी सरळ सेटमध्ये मात केली. त्यांच्या सुवर्ण कामगिरीमुळे भारताने या स्पर्धेत एकूण तीन पदके पटकावली. महिला एकेरीत मनिकाने कांस्य, तर मिश्र दुहेरीत अर्चनाने मानव ठक्करच्या साथीने कांस्यपदक जिंकले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत मनिकाला चीनच्या वँग यिडीकडून २-४ (७-११, ११-७, ११-१३, १२-१०, ७-११, ५-११) असा पराभव पत्करावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wtt contender lasko 2021 manika batra and archana girish kamath win womens doubles crown zws

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक