Irani Cup 2023 Updates: मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात द्विशतक झळकावल्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावातही आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. इराणी चषकाच्या चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वालने लंच टाईमपूर्वी यशस्वीने आक्रमक खेळी करत शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने एक इतिहास रचला आहे. इराणी चषकाच्या एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जैस्वालने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात द्विशतक झळकावून संघाची धावसंख्या ४०० च्या जवळ नेली होती. लंच टाइमपर्यंत रेस्ट ऑफ इंडियाने ७ विकेट गमावून २०१ धावा केल्या होत्या. यासह संघाने मध्य प्रदेशविरुद्ध ३९१ धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली.

Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 : केएल राहुलने वर्षानुवर्षे धोनीच्या नावे असलेला मोठा विक्रम मोडला, ही कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Punjab Kings vs Mumbai Indians match updates in marathi
PBKS vs MI : रोहित शर्मा रचणार इतिहास, एमएस धोनीनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार दुसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत रचला इतिहास, आयपीएलच्या १७ वर्षांत ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

३०० हून अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज –

या सामन्यात यशस्वीने आता ३०० हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत. इराणी चषकात अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनने इराणी चषकात एका सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात द्विशतक झळकावले आणि इराणी चषकात अशी कामगिरी करणारी सर्वात तरुण फलंदाज ठरला. या स्पर्धेतील त्याचे द्विशतक वयाच्या २१ व्या वर्षी झळकावले. यापूर्वी हा विक्रम प्रवीण अमरे यांच्या नावावर होता, ज्यांनी १९९० मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी द्विशतक झळकावले होते.

२१ वर्षीय फलंदाज यशस्वी जैस्वालची बॅट चौथ्या दिवशीही जोरदार तळपली आहे. यशस्वीने १०३ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या. लंच टाइमपर्यंत यशस्वीने १३२ चेंडूत १५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९१.६६च्या स्ट्राइक रेटने १२१ धावा केल्या आहेत. त्याला पुलकित नारंग (३*) साथ देत आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने २५९ चेंडूत ८२.३३ च्या स्ट्राईक रेटने २१३ धावा केल्या.

हेही वाचा – WPL 2023 Opening Ceremony: क्रिकेटच्या खेळपट्टीवर थिरकणार क्रिती आणि कियारा; उद्घाटन सोहळ्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

मयंक पुन्हा एकदा अपयशी –

भारताचा उर्वरित कर्णधार मयांक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. मयंकने दुसऱ्या डावात चार चेंडूंचा सामना केला, मात्र तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कुमार कार्तिकेयने आधीच मयंक अग्रवालला एलबीडब्ल्यू केले होते. त्याचबरोबर पहिल्या डावातही त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. मयंकने ११ चेंडूत दोन धावा केल्यानंतर आवेश खानच्या चेंडूवर हिमांशू मंत्रीच्या हाती झेलबाद झाला.