Yashasvi Jaiswal Record: भारताचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली आहे. २०२४ मध्ये तुफानी फलंदाजी करून त्याने एक असा विक्रम आपल्या नावावर केला जो आजपर्यंत जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही. यशस्वी जैस्वालने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेगवान फलंदाजी करत १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 3: मनू भाकेर-सरबजोत सिंगची पदक फेरीत धडक, भारताचं नेमबाजीत आणखी एक पदक निश्चित!

India Becomes First Team in 21st Century to Declared the First Innings under 35 overs in IND vs BAN Kanpur Test
IND vs BAN: टीम इंडियाने कानपूर कसोटीत लिहिला नवा इतिहास, २१व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19
Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक
Virat Kohli 27000 runs complete in international cricket
IND vs BAN : विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
SL vs NZ Kamindu Mendis creates record of most successive fifty plus scores since Test debut
SL vs NZ: ८ कसोटी, ८ अर्धशतकं; कामिंदू मेंडिसने रचला विश्वविक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स
Ian Chappell Statement on Jasprit Bumrah Rishabh Pant innings in Border Gavaskar Trophy Test Series sports news
बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान
IND vs BAN Yashasvi Jaiswal grabs Zakir Hasan catch video viral
IND vs BAN : बुमराहच्या गोलंदाजीवर यशस्वीने झाकीरचा ‘डायव्हिंग’ करत घेतला उत्कृष्ट झेल, VIDEO व्हायरल

भारत-श्रीलंका मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वालने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. याशिवाय तो एका कॅलेंडर वर्षात १००० धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला. या विक्रमासह विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या या विशेष विक्रमाची बरोबरी केली. दुसऱ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वालच्या ३० धावांच्या खेळीसह कर्णधार सूर्यकुमार यादवने २६ धावांची खेळी खेळली. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

हेही वाचा – IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचे सामने लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या योग्य चॅनेल व मोबाईल अ‍ॅप

यशस्वी जैस्वालच्या १००० धावा पूर्ण

यशस्वी जैस्वाल २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने आपल्या डावात ही खास कामगिरी केली. यशस्वीने यावर्षीच्या त्याच्या १३व्या सामन्यात ही खास कामगिरी केली. यासह यशस्वी जैस्वाल २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने या वर्षात आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये एकूण १०२३ धावा केल्या आहेत.

यशस्वी जैस्वालने यावर्षी आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत आणि केवळ एवढ्याच सामन्यांमध्ये त्याने १००० धावा पूर्ण केल्या आहेत. २०२४ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. यशस्वीने या वर्षात आतापर्यंत १०२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकावली. तो एकदा खातेही न उघडता बाद झाला आहे. १०२३ धावांमध्ये १०४ चौकार आणि ४२ षटकारांचा समावेश होता.

एका कॅलेंडर वर्षात १००० धावा पूर्ण करणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू

१९ वर्षे – सचिन तेंडुलकर (१९९२)
२१ वर्षे – रवी शास्त्री (१९८३)
२१ वर्षे – विनोद कांबळी (१९९३)
२१ वर्षे – सचिन तेंडुलकर (१९९४)
२२ वर्षे – दिनेश कार्तिक (२००७)
२२ वर्षे – विराट कोहली (२०१०)
२२ वर्षे – यशस्वी जैस्वाल (२०२४)