Yashasvi Jaiswal Gifts Luxury car to father: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने फादर्स डे निमित्त वडिलांना एक महागडी आलिशान कार भेट दिली आहे. यशस्वी जैस्वाल नुकताच अफगाणिस्तानविरूद्ध वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला होता. अखेरच्या सामन्यात त्याने दणदणीत शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. पण विराट वनडे संघात परतल्यानंतर त्याची मात्र निवड करण्यात आलेली नाही. यादरम्यान त्याने वडिलांना कार गिफ्ट दिल्यानंतर त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वगळण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, यशस्वीने असं काहीतरी केलं ज्याचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने, म्हणजेच रविवार, २१ जून रोजी यशस्वीने आपल्या वडिलांना एक आलिशान कार भेट दिली. यशस्वीचा भाऊ तेजस्वी याने या सुंदर क्षणाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले.
यशस्वी जैस्वालने वडिलांना भेट दिलेल्या कारची किंमत किती?
यशस्वी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह नवी कार घरी घेऊन येण्यासाठी शो रूममध्ये पोहोचला होता. त्याचे आई-वडील अत्यंत साध्या कपड्यांमध्ये या फोटोमध्ये दिसत आहेत. एकेकाळी तंबूत राहत क्रिकेटसाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या यशस्वी जैस्वाल पाणीपुरीच्या स्टॉलवर उदारनिर्वाह करणाऱ्या त्याच्या कुटुंबाला एक अमूल्य क्षण दाखवला. विशेष म्हणजे, यशस्वीने आपल्या वडिलांना भेट म्हणून दिलेली कार ‘मर्सिडीज जीएलएस’ (Mercedes GLS) असून, तिची किंमत सुमारे १.३२ ते १.४२ कोटी रुपये आहे.
यशस्वीचा भाऊ तेजस्वी जैस्वालने संपूर्ण कुटुंब आणि कारसोबतचा फोटो या पोस्टमध्ये सुरूवातीला शेअर केला आहे. त्यानंतर यशस्वीचे आई-बाबा कारची चाव व डॉक्युमेंट्स घेतानाचा सुंदर फोटो आहे. यानंतर तिसऱ्या फोटोमध्ये यशस्वी आईबाबांसह कारसमोर दिसत आहे. या पोस्टवर तेजस्वीने कॅप्शन लिहिलं आहे, “कुटुंब सोबत असेल, तर प्रत्येक स्वप्न साकार झाल्याचा आनंद द्विगुणित होतो.” चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी शानदार शतक झळकावले. तो ११० धावांवर नाबाद राहिला आणि त्याने टीम इंडियाला सहज विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, या कामगिरीनंतरही इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात त्याला स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी शानदार शतक झळकावलं. तो ११० धावांवर नाबाद राहिला आणि त्याने टीम इंडियाला सहज विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, या कामगिरीनंतरही इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात त्याला स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
