Rajasthan Royals new Captain for RR vs GT Match: आयपीएल २०२६ मधील आजच्या ९ मे ला होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरूद्ध संघाचा कर्णधार बदलला आहे. नियमित कर्णधार रियान पराग या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. यशस्वी जैस्वाल आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधार म्हणून खेळला. त्याने नाणेफेक जिंकून गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्लेऑफच्या दृष्टीने आता सर्व संघांसाठी सामने महत्त्वाचे असणार आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या गुणतालिकेत १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर गुजरातचा संघ १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. पण राजस्थानचा रन रेट चांगला असल्याने संघ टॉप-४ मध्ये आहे. आजचा सामना जिंकल्यास राजस्थानचा संघ पॉवरप्लेच्या दिशेने अजून एक भक्कम पाऊल टाकेल.

नाणेफेकीदरम्यान, यशस्वी जैस्वालने रियान परागच्या अनुपस्थितीचं कारणही उघड केलं. राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार यशस्वी जैस्वाल म्हणाला, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे परागला सामन्यातून बाहेर झाला आहे. मागील सामन्यात परागला ही दुखापत झाली होती. तो लवकरच तंदुरुस्त होऊन संघात सामील होईल अशी संघाला आशा आहे. रियान परागच्या अनुपस्थितीमुळे राजस्थान रॉयल्सलाही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करावे लागले आहेत. शिमरॉन हेटमायर आणि पुलकेशिया पुनिया यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही या सामन्यात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मानव सुथारच्या जागी प्रसिध कृष्णाचं संघात पुनरागमन झालं आहे, ही संघासाठी एक चांगली बातमी आहे. प्रसिध कृष्णाची कामगिरी आतापर्यंत प्रभावी राहिली आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये १२ बळी घेतले आहेत, पण तो गेल्या काही सामन्यांमध्ये संघात नव्हता. त्याच्या पुनरागमनामुळे गुजरातची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.

दोन्ही संघांसाठी प्लेईंग इलेव्हन

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन
शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, शुभम दुबे, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा, यश राज पुनजा.