Salman Ali Agha’s wife reply to trollers: टी-२० विश्वचषक सामन्यातील सुपर ८ फेरीत इंग्लंडबरोबर झालेल्या लढतीत पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवामुळे पाकिस्तानचा उपांत्यफेरीत जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी कर्णधार सलमान अली आघा याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना देखील ट्रोल केले. यानंतर सलमानची पत्नी सबा मांझरने ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.

सलमानच्या पत्नीचे ट्रोलर्सना उत्तर

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कर्णधार सलमान आगाचे पाकिस्तान चाहत्यांनी ट्रोलिंग केले. सलमानसह त्याच्या कुटुंबीयांनाही अनेकांनी लक्ष्य केले. यानंतर संतापलेल्या सलमानची पत्नी सबाने ट्रोलर्सना चांगलेच उत्तर दिले. सबाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ट्रोलर्सना खडसावलं. “पाकिस्तानी चाहत्यांनो, मला आणि माझ्या मुलाची बरं – वाईट बोलून तुम्हाला विश्वचषक जिंकता येणार नाही,” असे सबाने पोस्टमध्ये लिहले आहे. दरम्यान, यानंतर सबा मांझरने यानंतर ही स्टोरी डिलिट करुन खाते प्रायव्हेट केलं.

पराभवानंतर सलमान काय म्हणाला?

पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाने परभवावर भाष्य करतान त्यांचे प्रयत्न कमी पडल्याचे मान्य केले. दुसरी त्यांने इंग्लिश कप्तान हॅरी ब्रूकचे कौतुक केले. “आमच्या फलंदाजीची चांगली सुरुवात झाली पण, शेवट खराब झाला. मला वाटतं हॅरी उत्तम खेळला. आमची धावसंख्या कमी होती. आणि हॅरीने आमच्याकडून विजय हिरावून घेतला”, असे सलमान आगा सामन्यानंतर बोलताना म्हणाला. 

Salman Ali Agha Wife Post

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने ४५ चेंडूत ६३ धावा केल्या. तर बाबर आझमने २४ चेंडूत अवघ्या २४ धावा केल्या. फखर जमानने १६ चेंडूत २५, शादाब खानने ११ चेंडूत २३ धावा केल्या. पाकिस्तानला २० षटकांअखेर ९ गडी बाद १६४ धावा केल्या आल्या.

इंग्लंडचा विजय

पाकिस्तानने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट आणि जोस बटलर लवकर तंबूत परतले. कर्णधार हॅरी ब्रुकने ५१ चेंडूत १०० धावा करत संघाची कामगिरी उंचावली. यांतर जेकब बेथल (८), टॉम बॅन्टन (२), सॅम करनने (१६) धावा केल्या. अखेर विल जॅक्सने २८ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना ५ चेंडू आणि २ गडी राखून जिंकला.