Viral Commentry Video: क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात वय पाहिलं जात नाही. अनुभव आणि कौशल्य असेल तर कुठलाही खेळाडू या खेळात खूप नाव कमावू शकतो. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीसारखा युवा खेळाडू जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा खेळू शकतो. तर प्रविण तांबेसारखा एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरू शकतो. क्रिकेट म्हणजे फक्त बॅट आणि बॉलचा खेळ नाही, तर क्रिकेटमध्ये समालोचनही तितकंच महत्वाचं असतं. आतापर्यंत हर्षा भोगले आणि रवी शास्त्रीसारखे समालोचक आहेत, ज्यांनी खूप नाव कमावलं. दरम्यान सोशल मीडियावर एका मुलाचा समालोचन करत असतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याची तुलना रवी शास्त्री आणि हर्षा भोगले सारख्या दिग्गजांसोबत केली जाऊ लागली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कर्नाटक येथे एक लोकल क्रिकेटचा सामना सुरू आहे. मैदानात खेळाडू, स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर फलंदाज देखील असल्याचं दिसून येत आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही तुफान गर्दी केली आहे. फलंदाज मैदानात तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे हा तरूण मुलगा आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या समालोचनाने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
समालोचन करणं हे मुळीच सोपं नसतं. कारण मैदानावर नेमकं काय घडतं आहे, हे सतत सांगावं लागतं. तसेच बोलण्यात वेगळेपण असावं लागतं. सतत तेच तेच ऐकून प्रेक्षक वैतागून जातात. त्यामुळे त्यांचं मनोरंजन करण्याचं कामही समालोचक करत असतात. मुख्य बाब म्हणजे, हा मुलगा स्पष्ट इंग्रजी भाषेत समालोचन करताना दिसून येत आहे. या भन्नाट इंग्रजी समालोचनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ Imthrishool या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हटके कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. व्हिडीओवर, “harsha bhogle and ravi shastri mentoring him in another universe”, असं लिहिलं आहे. तसेच या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

