आफ्रिकेवर ४५ धावांनी मात; कर्णधार धूलची अर्धशतकी खेळी

महाराष्ट्राचा डावखुरा अष्टपैलू विकी ओत्सवालने (५/२८) केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर गतउपविजेत्या भारताने युवा एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत (१९ वर्षांखालील) दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव करून विजयी सलामी नोंदवली.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

भारताने दिलेल्या २३३ धावांचा पाठलाग करताना ओत्सवाल आणि वेगवान गोलंदाज राज बावा (४/४७) यांनी आफ्रिकेचा डाव ४५.४ षटकांत १८७ धावांत गुंडाळला. त्यांच्याकडून डेवल्ड ब्रेव्हिसने (६५) अर्धशतकी झुंज दिली. ‘ब’ गटात समावेश असलेल्या भारताची बुधवारी आयर्लंडशी गाठ पडेल.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यावर यश धूलने १०० चेंडूंत ११ चौकारांसह ८२ धावांची कर्णधाराला साजेशी खेळी साकारली. त्याला महाराष्ट्राचा कौशल तांबे (३५) आणि शेख रशिद (३१) यांनी उत्तम साथ दिली. तरीही भारताचा डाव ४६.५ षटकांत २३२ धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ४६.५ षटकांत सर्व बाद २३२ (यश धूल ८२, कौशल तांबे ३५; मॅथ्यू बोस्ट ३/४०) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : ४५.४ षटकांत सर्व बाद १८७ (डेवल्ड ब्रेव्हिस ६५; विकी ओत्सवाल ५/२८, राज बावा ४/४७)

’ सामनावीर : विकी ओत्सवाल

’ गुण : भारत २, दक्षिण आफ्रिका ०