आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा युजवेंद्र चहल चांगलाच फॉर्मात आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळल्या गेलेल्या ५ सामन्यात १० गडी बाद केले आहेत. मात्र असं असलं तरी आगामी टी २० विश्वचषकासाठी त्याची निवड झालेली नाही. त्याची कामगिरी पाहता निवड समिती १० ऑक्टोबरपूर्वी त्याची संघात निवड करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडीबाबत गुऱ्हाळ सुरु असताना युजवेंद्र चहलच्या पत्नीने एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री एक प्रोफेशनल डान्सर आहे. प्यूमासाठी युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्रीने एक डान्स केला आहे. दोघांनी पंजाबचा प्रसिद्ध गायक हार्डी संधूच्या “क्या बात है…” या गाण्यावर ठेका घेतला. हा व्हिडिओ शेअर करत धनश्रीने त्यावर एक पोस्ट लिहिली आहे. “फिल्डवर फिरकी आणि गाण्याच्या बीटवरही फिरकी”, अशी कॅप्शन लिहिली आहे. यासह प्युमा क्रिकेट, आरसीबी, युजवेंद्र चहल आणि हार्डी संधू यांना टॅग केलं आहे. युजवेंद्र चहल आपल्या पत्नीसोबत सध्या युएईत आहे.

बंगळुरुने आयपीएल २०२१ स्पर्धेत क्वालिफाय केल्यांतर चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. “आरसीबी टीमसाठी पूर्ण आयपीएलमध्ये किनाऱ्यावर बसलो आहे आणि आपलं १०० टक्के देण्यासाठी तयार आहे”. या ट्वीटनंतर कोलकाता नाइट राइडर्सचा दिग्गज फिरकीपटूने मजेदार रिट्वीट केलं आहे.

“तू नेहमीत आपलं सर्वश्रेष्ठ दिलं आहे. ते कायम ठेव. आणि निश्चित कर की, योग्य गतीने गोलंदाजी करत राहा. खूप धीम्या गतीने बरोबरनाही. अजूनही टी २० विश्वचषकासाठी तू संघात असावा असं वाटतंय. चॅम्पियन बॉलर”, असं रिट्वीट हरभजनने केलं आहे.

Story img Loader