कर्णधार युसूफ पठाणच्या घणाघाती नाबाद अर्धशतकाच्या बळावर बडोद्याने पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत महाराष्ट्राचा सहा विकेट राखून पराभव केला.
बडोद्याने सलग चौथ्या विजयासहित विभागीय विजेत्याच्या अविर्भावात आता मुश्ताक अली अव्वल साखळी स्पध्रेत स्थान मिळवले आहे.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ७ बाद १३९ धावा उभारल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बडोद्याचा डाव ४ बाद ६९ असा कोसळला होता. परंतु युसूफने ७ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करीत २४ चेंडूंत ५७ धावा केल्या. त्याने राकेश सोलंकीसोबत पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सोलंकीने ३६ चेंडूंत नाबाद ४० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : २० षटकांत ७ बाद १३९ (राहुल त्रिपाठी ३२; इरफान पठाण २/३७) पराभूत वि. बडोदा : १७.३ षटकांत ४ बाद १४२ (युसूफ पठाण नाबाद ५७, राकेश सोलंकी नाबाद ४०; श्रीकांत मुंढे २/२६).