scorecardresearch

Video: युवराज सिंग म्हणतो, “किसी डिस्को में जाए…”, गोविंदाच्या गाण्यावरील डान्स व्हायरल

Yuvraj Singh Dance Video: युवराज सिंगने १० जून २०१९ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Video: युवराज सिंग म्हणतो, “किसी डिस्को में जाए…”, गोविंदाच्या गाण्यावरील डान्स व्हायरल
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. सोशल मीडियावर स्वत: केलेल्या पोस्ट आणि इतर खेळाडूंच्या पोस्टवर मिश्किल कमेंट्स केल्यामुळे तो सतत चर्चेत असतो. आता देखील तो आपल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. सध्या युवराजचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

युवराजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘वीकेंड वाइब्स’, असे कॅप्शन युवराजने व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओमध्ये तो बॉलिवुड अभिनेता गोविंदाच्या ‘किसी डिस्को में जाए’ या गाण्यावर डान्स करत आहे. एका हातामध्ये स्पिकर घेऊन डान्स करत-करत तो पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसत आहे. युवराजचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अडीच लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.

युवराज सिंगने १० जून २०१९ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या घटनेला काल तीन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, आजही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. युवराजदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्य संपर्कात असतो. यावर्षी एका मुलाचा पिता झालेला युवराज सध्या पत्नी हेझलसह मुलाच्या संगोपनात व्यग्र आहे.

हेही वाचा – Video: ‘धोनीसह सराव की सचिनसह जेवण?’, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने क्षणात दिले उत्तर

दरम्यान, नुकताच युवराजने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने क्रिकेटच्या मैदानात परतण्याचे संकेत दिले आहेत. या व्हिडिओमध्ये तो त्याचे क्रिकेट किट पॅक करून प्रशिक्षण सत्राकडे जाताना दिसत आहे. आता सराव करून युवराज कोणत्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार आहे? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yuvraj singh dance on govindas song kisi disco main jayen video went viral vkk

ताज्या बातम्या