भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने IPL 2019 नंतर निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याने अलविदा म्हटले. मात्र देशांतर्गत टी २० लीग स्पर्धांमध्ये तो खेळतच राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावुक झाला होता. त्यानंतर युवराज विदेशातील टी २० आणि टी १० लीग स्पर्धांमध्ये खेळला. पण तरीही IPL मधील आठवणी त्याला विसरता येणं शक्यच नाही.

“विराट सर्वोत्तम वाटणाऱ्यांनी बाबर आझमची फलंदाजी बघा”

युवराजने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत असतानाचा एक सिक्सरचा व्हिडीओ शेअर केला आहे. युवराजच्या त्या व्हिडिओत तो कोलकाता विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसतो. त्याला एक वेगवान गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू टाकतो. तो चेंडू युवराजच्या ऑफ साईडला कमरेच्या थोडा वर असा येतो आणि युवराज तो चेंडू छान पैकी सीमारेषेच्या बाहेर टोलवतो. या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये युवराजने लिहिले आहे की हा मी खेळलेल्या माझ्या आवडत्या शॉटपैकी एक शॉट आहे. वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कव्हर्स क्षेत्रातून षटकार मारणे हे खूप कठीण असते. यासोबत युवराजने ipl memories हा हॅश टॅग देखील वापरला आहे.

“भारत म्हणजे मॅच फिक्सिंग माफियांचं आश्रयस्थान”; पाकिस्तानी खेळाडूचा आरोप

दरम्यान, युवराजचे वडिल योगराज सिंह यांनी नुकताच न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनी आणि विराट या दोघांनीही युवराजच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला. “मी असं म्हणेन की या दोघांसोबत निवड समितीनेही युवराजला धोका दिला. मी काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांना भेटलो, त्यांच्याशी बोलताना मी हा मुद्दा काढला होता. अनेकांनी युवराजला धोका दिला आहे आणि या गोष्टीचा त्याला नेहमी त्रास झाला. शरणदीप जेव्हा कधीही संघनिवडीची बैठक व्हायची, त्यावेळी सांगायचा की युवराजला संघातून वगळलं पाहिजे. बोर्ड अशा लोकांना निवड समितीवर बसवतं, ज्यांना क्रिकेटमधलं मुलभूत ज्ञानही नाही. अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार?”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.