करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपली जबाबदारी ओळखत गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप करत आहे. तो त्या संदर्भातील फोटो आणि अपडेटदेखील ट्विटरवरून साऱ्यांना देत आहे. त्याची स्तुती केल्यामुळे युवराज सिंग चर्चेत आहे. त्याला नेटिझन्सच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यासोबतच युवराज एका धक्कादायक वक्तव्यामुळेही चर्चेत आहे. धोनी आणि विराटने मला हवा तसा पाठिंबा दिला नाही, असे वक्तव्य युवराजने केले.

आफ्रिदीचं कौतुक करताच नेटक-यांनी भज्जी, युवीला घेतलं फैलावर

काय म्हणाला युवराज?

“सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात मी खेळलो आणि मला त्याच्याकडून खूप सहकार्य मिळाले. त्याच्यानंतर महेद्रसिंग धोनी कर्णधार झाला. त्यामुळे सौरव गांगुली आणि धोनी यांच्यातील सर्वोत्तम कर्णधार कोण हे सांगणं कठीण आहे. माझ्या सर्वाधिक आठवणी गांगुलीसोबतच्या आहेत, कारण त्याने मला त्याने खूप पाठिंबा दिला. पण धोनी आणि विराटने मात्र मला तसा पाठिंबा दिला नाही”, असा खळबळजनक आरोप युवराजने केला. स्पोर्टस्टारला मुलाखत देताना त्याने हे सांगितले.

CoronaVirus : रैनाने दिला मदत निधी, त्यावर पंतप्रधान मोदी म्हणतात…

युवराज गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघात खेळला. त्यानंतर २००७ साली झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विजेतेपद मिळवले. त्या स्पर्धेत युवराज स्टार खेळाडू म्हणून उदयास आला. त्यानंतर २०११ च्या विश्वचषक विजेतेपदातही युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर युवराजच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यामुळे धोनी आणि त्यानंतर विराटच्या नेतृत्वाखालील संघात युवराजला आपले स्थान कायम राखणे शक्य झाले नाही. अखेर जून २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.