Yuvraj Singh in IPL: आयपीएल २०२५च्या मेगा लिलावापूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh in IPL) ६ वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार असल्याची सध्या चर्चा आहे. यावेळी युवी आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून नव्हे तर प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करू शकतो. वृत्तानुसार, गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी मेगा लिलावापूर्वी संघापासून वेगळे होण्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्याचवेळी फ्रँचायझी युवराज सिंगशी संपर्क करत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

हेही वाचा – Gautam Gambhir: “शिफारसीमुळे कोच…”, गौतम गंभीर प्रशिक्षक होताच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केले आरोप, पाहा नेमकं काय म्हणाला?

Indian Cricket Team To Get New Batting Coach In Gautam Gambhir Support Staff BCCI To Take New Decision
टीम इंडियाला मिळणार नवा फलंदाजी प्रशिक्षक? गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह, BCCI मोठा निर्णय घेणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ulta chashma
उलटा चष्मा : रम्य ‘ती अडीच वर्षे’
ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Vasai, Bhayandar police , Vasai, Bhayandar police force,
वसई, भाईंदर पोलीस दलात मोठे फेरबदल; ३ अधिकारी परतले, ६ नवीन अधिकारी झाले कायम
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

नेहरा आणि सोलंकी आयपीएल २०२२ मध्ये टायटन्समध्ये सामील झाले आणि फ्रँचायझीला पदार्पणाच्या हंगामात पहिले विजेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएल २०२३ मध्ये अंतिम फेरीपर्यंत टायटन्सने चमकदार कामगिरी केली, जिथे चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा पराभव केला. मात्र, २०२३ मध्ये संघात बदल करण्यात आले आणि हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये गेल्यानंतर शुबमन गिलला कर्णधार बनवण्यात आले. त्याचवेळी शमीला दुखापत झाल्याने तो २०२३ चा हंगाम खेळला नाही. त्यामुळे संघाची कामगिरी विशेष झाली नाही. २०२३च्या मोसमात गुजरात गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता.

हेही वाचा – Mohammad Shami: “१९व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून…” मोहम्मद शमीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, मित्राचा धक्कादायक खुलासा

युवराज सिंग आयपीएलमध्ये कोणत्या संघाचा कोच होणार?

स्पोर्ट्स 18 च्या रिपोर्टनुसार, आता मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझी मोठा निर्णय घेणार आहे. गुजरात फ्रँचायझी युवराज सिंगला संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्याच्या विचारात आहे. यासाठी संघ व्यवस्थापन युवीच्या संपर्कात आहेत. यासंबंधित एका सूत्राने सांगितले की, “संघात बरेच बदल होणार आहेत. आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी संघाला अलविदा करण्याची शक्यता आहे आणि युवराज सिंगसह चर्चा करण्यास सुरूवात झाली आहे. अद्याप काहीही ठरलेले नाही, परंतु गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये काही मोठे बदल होऊ शकतात.”

हेही वाचा – Rahul Dravid: पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड? KKR नव्हे तर ‘या’ संघासह IPL मध्ये करणार पुनरागमन

सध्या गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने युवराज सिंगकडे क्रिकेटचे धडे गिरवले होते. युवराज सिंगला आयपीएलमध्ये कोचिंगचा अनुभव नाहीय. गेल्या तीन मोसमात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक असलेले गॅरी कर्स्टन यांनी यापूर्वीच संघापासून वेगळे झाले असून त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. टायटन्सचे इतर कोचिंग स्टाफ सदस्य – आशिष कपूर, नईम अमीन, नरेंद्र नेगी आणि मिथुन मन्हास हे देखील फ्रँचायझीपासून वेगळे होण्याची शक्यता आहे.

युवराज सिंग शेवटचा सामना आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळाडू म्हणून खेळला होता. त्याने ६ वर्षांपूर्वी आयपीएलमधील शेवटचा सामना CSK विरुद्ध खेळला होता. आपल्या आयपीएल कारकिर्दीत युवीने १३२ सामन्यांमध्ये २७५० धावा केल्या आहेत आणि ३६ विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला आहे. युवराज सिंग आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, पुणे वॉरियर्स, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

Story img Loader