युवराज सिंगने युझवेंद्र चहलला केले ट्रोल, म्हणाला ‘तुझ्या दुधी भोपळ्याचा आकार…’

युवराज आणि चहलची सोशल मीडियावर सतत मजेशीर शाब्दिक कुस्ती सुरू असते.

युवराज सिंगने युझवेंद्र चहलला केले ट्रोल, म्हणाला ‘तुझ्या दुधी भोपळ्याचा आकार…’
फोटो सौजन्य – सोशल मीडिया

भारतीय संघातील माजी धडाकेबाज खेळाडू युवराज सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. मात्र, काहीना काही कारणामुळे तो सतत चर्चेत असतो. निवृत्त झाल्यापासून तो सोशल मीडियावर विशेष अ‌ॅक्टिव्ह झाला आहे. आपल्या माजी सहकारी खेळाडूंच्या पोस्टवर मजेशीर कमेंट्स करून तो धमाल उडवून देतो. कधीकधी तो आपल्याच मित्रांना ट्रोलही करतो. अशाच एका कारणासाठी युवराज चर्चेत आला आहे. त्याने भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या फोटोवर एक मिश्किल कमेंट केली. त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला असून युवराजची ही कमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे.

युझवेंद्र चहलने नुकतीच पंचायत-२ वेबसीरिज संदर्भात एक पोस्ट केली आहे. या वेबसिरीजमध्ये दुधी भोपळ्याचा एखाद्या पात्राप्रमाणे वापर करण्यात आला आहे. सिरीजमधील सरपंच सचिव असलेल्या जितेंद्रला सतत दुधी भोपळा भेट देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही गोष्ट लक्षात घेत चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चहलने एक दुधी भोपळा बॅटसारखा हातात धरला आहे. ‘ मी पैज लावतो माझ्या हातातील दुधी भोपळ्याने मारलेला चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडेल. तुम्हाला काय वाटते जितेंद्र?’ अशी कॅप्शनही या फोटोला दिली आहे.

अशी पोस्ट केल्याचा चहलला आता नक्की पस्तावा होत असेल. कारण, युवराज सिंगने त्याच्या पोस्टवर कमेंट करून ट्रोल केले आहे. ‘तुझ्या दुधी भोपळ्याचा आकार तुझ्याएवढाच आहे,’ अशी कमेंट युवराजने केली आहे. ही कमेंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. युवराज आणि चहलची सोशल मीडियावर सतत मजेशीर शाब्दिक कुस्ती सुरू असते. आयपीएलचा १५वा हंगाम सुरू होण्यापूर्वी चहलने राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी घालून फोटो पोस्ट केला होता. त्यावरदेखील युवराज सिंगने मजेशीर कमेंट केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yuvraj singhs hilarious comment on yuzvendra chahals lauki post goes viral vkk

Next Story
‘मला सचिनला जखमी करायचे होते,’ पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने दिली कबुली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी