Yuzvendra Chahal Kuldeep Yadav: १८ महिन्यांनंतर, ‘कुलचा’ ची जोडी एकत्र सामन्यात खेळताना दिसली, दोघांनीही न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ५ गडी बाद केले, ज्यात ३ बळी कुलदीप आणि २ बळी चहल असे नाव देण्यात आले. मी तुम्हाला सांगतो की तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने ९० धावांनी विजय मिळविला आणि मालिका ३-०ने जिंकण्यात यश मिळविले. भारताच्या विजयानंतर चहल आणि कुलदीप यांच्या मजेशीर खोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी फिरकी जोडी एकमेकांशी चेष्टा-मस्करी करताना दिसत आहे.

खरं तर, सामन्यानंतर रोहित शर्मा जेव्हा हर्षा भोगले यांना मुलाखत देत होता, तेव्हा चहल त्याचा सहकारी रिस्ट स्पिनर कुलदीपचा कान ओढताना दिसला. त्यामुळे कुलदीपला थोडा धक्का बसतो अन तो ही त्याच्याशी मजा मस्करी करतो. ‘कुलचा’ जोडीचा हा याराना सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. याआधी २०२१ साली इंदोर मध्येच टीम इंडियासाठी एकत्र खेळले होते त्यानंतर कालच्या सामन्यात त्यांना संधी मिळाली.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य

किंबहुना, अलीकडच्या काळात कुलदीपने दमदार खेळ दाखवला, त्यामुळे चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे कठीण झाले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराज आणि शमीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अशा परिस्थितीत चहलनेही निराश केले नाही आणि ७.२ षटके टाकताना त्याला एकूण ४३ धावांत २ बळी घेता आले. त्याचवेळी कुलदीपने ९ षटकात ६२ धावा देत ३ बळी घेतले.

काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्मा यावेळी म्हणाला की, “मागील सहा एकदिवसीय सामन्यादरम्यान आम्ही अधिकतर चांगल्या गोष्टी केल्या आहेत. शेवटच्या वन डेत आम्ही बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ इच्छित होतो. आम्ही फलकावर धावा कुटल्या होत्या. मात्र, अशाप्रकारच्या मैदानावर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. आम्ही आमच्या योजनांवर कायम राहिलो.”

हेही वाचा: Michael Vaughan on Team India: वर्ल्ड कप २०२३ साठी टीम इंडिया फेव्हरेट! मायकेल वॉर्नने इंग्लंडसहित सर्व संघाला दिला इशारा

रोहितने सामन्यात ८५ चेंडूत शतक साकारले. त्याविषयी बोलताना तो म्हणाला की, “हे शतक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी मोठी खेळी करणे आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाणे महत्त्वपूर्ण होते.” तसेच, वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचण्याच्या प्रश्नावर तो म्हणला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर आम्ही रँकिंगबाबत चर्चा करत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे कसोटी आव्हान सोपे नसेल. मात्र, आम्ही त्यासाठी तयार आहोत.”