Yuzvendra Chahal Viral Video: भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सारं काही अलबेल नसल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. इतकंच नव्हे तर हे दोघेही घटस्फोट घेणार अशी चर्चा रंगली आहे. याचदरम्यान धनश्री आणि चहलने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.यानंतर चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील धनश्री बरोबरचे फोटोही डिलीट केले आहेत. त्यामुळे या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. पण आता चहलचा नशेत असलेला एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चहल जवळपास दीड वर्षांपासून भारतीय संघाचा नियमित भाग राहिलेला नाही. आता धनश्री वर्मापासून वेगळे झाल्याच्या त्याच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, दोघे वेगळे झाले आहेत. लवकरच घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर ही माहिती अधिकृतपणे सर्वांना कळवली जाईल. दरम्यान, चहलच्या नशेत असलेल्या व्हायरल व्हीडिओची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – Yuzvendra Chahal Dhanashree Verma: युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा घटस्फोट घेणार? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो, चहलने फोटोही केले डिलीट

युजवेंद्र चहलच्या व्हायरल व्हीडिओमागचं सत्य

युजवेंद्र चहलच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत तो मद्यधुंद असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे तो नशेत असल्याने त्याला चालता येत असून तो मित्राचा आधाराने चालत असल्याचे दिसत आहे. एक व्यक्ती त्याला कारमध्ये बसवतानाही दिसत आहे. आता त्याचे चाहते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. याबाबत चाहते दावा करत आहेत की, वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या चढउतारांमुळे त्याची ही अवस्था झाली आहे. मात्र चहलचा हा व्हीडिओ जुना असून २०२३ मधील आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?

युजवेंद्र चहलचा हा व्हायरल होत असलेला व्हीडिओ २०२३ मधील रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे, जेव्हा धनश्री आणि चहल एकत्र होते. चहलला त्याचे मित्र या पार्टीनंतर पकडून कारमध्ये बसवतानाचा हा व्हीडिओ आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची ओळख करोनाच्या काळात झाली. कोरोना महामारीच्या काळात चहलला आपल्या मोकळ्या वेळेत डान्स शिकायचा होता. याबाबत त्याने धनश्री वर्माशी संपर्क साधला. डान्स क्लास दरम्यान हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. यानंतर दोघांनी २०२० मध्ये लग्न केले. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”

दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत, तर याआधी अनेकदा ते रील बनवताना दिसले होते. चहलने अलीकडेच सुट्ट्यांमध्ये फिरायला गेल्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत, पण धनश्री त्यापैकी एकाही फोटोत दिसली नाही. तर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघांपैकी एकानेही पोस्ट केली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal drunk and stumbling while walking video goes viral amid divorced rumours with wife dhanashree verma bdg