Yuzvendra Chahal Controversy: आयपीएल २०२६ दरम्यान युझवेंद्र चहल सातत्याने वादांमुळे चर्चेत आला आहे. पंजाब किंग्स संघाचा भाग असलेला चहल मैदानापेक्षा मैदानाबाहेरील कृत्यांमुळे चाहत्यांच्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कार चालवत सिगारेट पितानाचा त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यानंतर चहलला चाहत्यांनी चांगलंचं सुनावलं होतं. यादरम्यान आता अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याचा खुलासा तिने चॅट दाखवत स्वत: केला आहे.
युझवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. पण मैदानाबाहेरील त्याच्या वादांमुळे तो चर्चेचा विषय आहे. धनश्री वर्माबरोबर घटस्फोटानंतर चहलचं नाव आरजे महावश हिच्याशी जोडलं जात होतं. पण त्या दोघांमध्येही कालांतराने बिनसलं. यानंतर आता चहल एका अभिनेत्रील मेसेज करत असल्याचा खुलासा तिने केला आहे.
‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्ये दिसलेल्या अभिनेत्री तानिया चॅटर्जीने चहलबद्दल एक धक्कादायक दावा केला आहे. तानियाने पापाराझींसमोर तिच्या फोनमधील एक खाजगी चॅट उघडून खुलासा केला आहे की, चहलने तिला मेसेज केला होता. तानिया चॅटर्जीने म्हटलं की तिला युझवेंद्र चहलने तिच्या फोटोवर क्युट असा मेसेज तिला केला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
युझवेंद्र चहलने तानिया चॅटर्जीला केलेला हा मेसेज देखील आश्चर्यकारक आहे, कारण तिच्या म्हणण्यानुसार, ती चहलला पर्सनली ओळखत नाही. त्यामुळे, जेव्हा चहलने तिला मेसेज पाठवला तेव्हा तिला धक्का बसला. तिचा दावा आहे की, चहलने तिच्या एका स्टोरीवर मेसेज केला होता.
तानिया चॅटर्जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिने तिच्या फोनमध्ये सर्वात आधी युझवेंद्र चहलचं इन्स्टाग्राम अकाऊंट ऑन करून दाखवलं. त्यानंतर तिने चॅट ओपन करत पापाराझींना दाखवली. संभाषणादरम्यान, तिने कॅमेऱ्यासमोर चॅट दाखवला, ज्यामध्ये चहलने तिच्या दोन फोटोंवर क्युट असा पर्सनलला रिप्लाय दिला होता. तिने कॅमेऱ्यासमोर केलेला हा प्रकार पाहून तिचा दावा खरा असल्याचं दिसून येत आहे.
