Zimbabwe beat Sri lanka by 6 wickets: झिम्बाब्वे संघाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत श्रीलंकेच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. झिम्बाब्वे संघ श्रीलंकेचा ६ झिम्बाब्वे संघाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत श्रीलंकेच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. झिम्बाब्वे संघ श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभूत केलं आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा संघाच्या विजयाचा हिरो ठरला. झिम्बाब्वे संघाचा हा इतिहासातील दुसरा सर्वोत्कृष्ट रन चेस आहे.पराभूत केलं आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा संघाच्या विजयाचा हिरो ठरला.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पथुम निसांकाच्या खेळीच्या बळावर १७८ धावसंख्या उभारली. तर प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाच्या प्रत्येक खेळाडूने महत्त्वपूर्ण धावांचं योगदान देत १९.३ षटकांत सामना सहज जिंकला. सिकंदर रझाने २६ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांची झटपट खेळी केली.

श्रीलंकेने दिलेल्या १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरूवात चांगली झाली. ब्रायन मारूमणी व बेनेट यांनी पहिल्या विकेटसाठी ६९ धावांचं योगदान दिलं. मारूमणी २६ चेंडूत ३४ धावा करत बाद झाला. तर रायन बर्लने २३ धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार सिंकदर रझा २६ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावा करत बाद झाला. सिकंदर रझाने केलेली ४५ धावांती खेळी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. तर सलामीवीर ब्रायन बेनेट ४८ चेंडूत ८ चौकारांसह ६३ धावा करत नाबाद राहिला.

संघाला १२ चेंडूत १३ धावांची गरज असताना १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सिकंदर रझा झेलबाद झाला. तर चौथ्या चेंडूवर मुसेकिवा झेलबाद झाला. दुष्मंथा हेमंथाने १९व्या षटकात सामन्याचा रोख बदलला, पण झिम्बाब्वे संघाला विजयापासून दूर मात्र ठेवू शकला नाही. अखेरच्या षटकात मुनयोंगाने एक षटकार लगावत संघाचा विजय सोपा केला. श्रीलंकेकडून दुनिथ वेलाल्गे व दासून शनाका यांनी प्रत्येकी १-१ तर दुशान हेमंथाने २ विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा पाचारण केलं. श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली, यासह संघाने २० षटकांत ७ बाद १७८ धावसंख्या उभारली. पथुम निसांकाने ४१ चेंडूत ८ चौकारांसह ६२ धावा केल्या. तर कुसल परेरा २२ धावा करत बाद झाला. कुसल मेंडिसने १४ धावांचं योगदान दिलं. पवन रत्नायकेने २५ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ४४ धावा केल्या. तर दुनिथ वेलाल्गेने १५ धावांचं योगदान दिलं. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझरबानी, ग्रॅमी क्रीमर, ब्रॅड इव्हान्स यांनी २-२ विकेट्स घेतल्या. तर रायन बर्लने १ विकेट घेतली.