Zimbabwe vs Bangaldesh 1st ODI Highlights: अत्यंत कमी धावसंख्येच्या आणि शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर बांगलादेश संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला. सामन्यादम्यान अनेकांनी बांगलादेशचाच विजय निश्चित मानला होता, पण झिम्बाब्वेच्या संघाने मोठा अपसेट करत बांगलादेशविरूद्ध थरारक विजय नोंदवला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी दबावाखाली अफलातून कामगिरी करत अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला.

नवव्या विकेटसाठी न्यामहुरी आणि नगरावा यांनी केलेली ६३ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. त्या भागीदारीमुळे झिम्बाब्वेला लढण्यासाठी आवश्यक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर ‘शेव्रॉन्स’ने गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केल. ब्लेसिंग मुजराबानी आणि रिचर्ड नगरावा यांनी नव्या चेंडूवर भेदक मारा करत पहिल्याच पाच षटकांत बांगलादेशच्या अव्वल फलंदाजांना तंबूत धाडलं.

३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक बांगलादेशने जिंकत झिम्बाब्वेला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाज करणारा झिम्बाब्वेचा संघ ३६.४ षटकांत १४१ धावा करूच शकला. ब्रायन बेनेट व बेन करन १८ व १८ धाव करत बाद झाले. यानंतर इनोसेंट कियाने २६ धावांचं योगदान दिलं. यानंतर ५ फलंदाज तर मिळून १० धावाही करू शकले नाही आणि नाहिद राणाच्या गोलंदाजीसमोर फेल ठरले. यानंतर न्यूमन न्यामुहारीने ३३ धावा व रिचर्ड नगारवाने २७ धावांची खेळी करत दोघांनी मिळून ६३ धावांची खेळी करत संघाला १४१ धावा करू दिल्या.

बांगलादेशकडून नाहिद राणा गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. नाहिद राणाने १० षटकांत २ मेडन षटकं टाकत२१ धावा देत ६ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. तर तस्किन अहमदने २ व मेहदी हसनने एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनीही धुमाकूळ घातला. १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ११६ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशचे टॉप-३ फलंदाज एकेरी धावसंख्येत माघारी परतले. यानंतर तौहीद हृदोय आणि नुरुल हसन (यांनी सुरुवातीचा दबाव झेलत संयमी खेळ केला. दोघांमधील ४९ धावांची भागीदारी पाहता बांगलादेश संकटातून सावरल्याचं वाटत होतं. मात्र, हृदोय बाद होताच सामन्याने कलाटणी घेतली आणि तिथून झिम्बाब्वेने सामन्यावर पूर्ण पकड मिळवत संस्मरणीय विजयाची नोंद केली.

झिम्बाब्वेकडून कर्णधार रिचर्ड नगारवा व ब्राड इवान्स यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर ब्लेसिंग मुझारबानी व न्यूमन न्यामुहारी यांनी २-२ विकेट्स घेतल्या.