टी-२० विश्वचषक २०२६ च्या सेमीफायनलचे संघ ठरले. त्यामुळे सुपर-८ मधून ४ संघ बाहेर पडले आहेत. त्यापैकी आता ४ संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत. पण त्यातील एक संघ मात्र अद्याप मायदेशी परतू शकलेला नाही. मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीला इराणवर मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अनेक उच्च सुरक्षा अधिकारी ठार झाले. त्यानंतर इराणने प्रत्युत्तर दिल्यानंतर हवाई क्षेत्रावर याचा परिणा झाला आहे.
मध्य पूर्वेत संध्या युद्ध पेटलं आहे आणि इराणने इस्रायल आणि आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिलं आहे. याचा परिणाम आता भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर झाला आहे. हवाई क्षेत्र बंद करण्यात आली असून विमान प्रवासला मोठा फटका बसला आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर झिम्बाब्वेसमोर मोठे आव्हान आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर संघ भारतातून मायदेशी परतण्याची तयारी करत होता, परंतु पश्चिम आशियातील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे त्यांचं माघारी जाणं लांबणीवर गेलं आहे. झिम्बाब्वेने रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला, जिथे त्यांना पराभव पत्करावा लागला. सुपर आठमधून बाहेर पडल्यानंतर त्यांची मोहीम संपली.
योजनेनुसार, संघ सोमवारी सकाळी दिल्लीहून हरारेला जाण्यासाठी बॅचमध्ये रवाना होणार होता, ते एमिरेट्स एअरलाइन्सच्या फ्लाइटने दुबईमार्गे पोहोचणार होते. काही सदस्यांना पहाटे ४:३० वाजता निघायचे होते, तर काही जण उशिरा निघणार होते. पण, इराण-इस्रायल युद्धानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दुबईसारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांवर परिणाम झाला आहे. बहुतेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, ज्यामुळे झिम्बाब्वे संघ परत जाऊ शकला नाही.
झिम्बाब्वे संघ सध्या दिल्लीत आहे. त्यांना ४ मार्चपर्यंत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून आयसीसीने आकस्मिक योजनेवर काम सुरू केलं आहे. स्पर्धेचे आयोजक युरोपियन, दक्षिण आशियाई किंवा आग्नेय आशियाई केंद्रांसारख्या इतर मार्गांचा आणि विमान कंपन्यांचा शोध घेत आहेत. आयसीसीने एक ट्रॅव्हल सपोर्ट डेस्क देखील सुरू केला आहे आणि रिअल-टाइम अपडेट्स मिळविण्यासाठी सुरक्षा सल्लागारांसोबत काम करत आहे.
