भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची मुलगी झिवा यांचे व्हिडियो कायम चर्चेचा विषय ठरतात. झिवाचे गोड फोटो आणि व्हिडीओ धोनी सोशल मीडियावर पोस्ट करतो न करतो तोच ते व्हायरलही होतात. जगभरात धोनीचे असणारे अगणित चाहते आता झिवाचेही चाहते झाले आहेत. आपल्या लाडक्या बाबांसाठी मैदानात पाण्याची बाटली घेऊन धावत जाणारी झिवा, कॅप्टन कूलसोबत लाडू फस्त करणारी झिवा, पोळ्या लाटणारी झिवा, दोन भाषेत आपल्या बाबाला कसे आहात वेचणारी झिवा… असे तिचे भरपूर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेतच. त्यात आता झिवा आणि धोनीचा आणखी व्हिडीओ धोनीने पोस्ट केला आहे.
इंस्टाग्रामवरील या व्हिडिओत झिवा आपल्या वडिलांना नाचायचं कसं याचे धडे देत आहे. एका गाण्यावर झिवा डान्स करत आहे. त्यानंतर धोनी झिवाच्या स्टेप्स पाहून त्याप्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.




हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच प्रसिद्ध होताना दिसत आहे. या पूर्वी झिवाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. या व्हिडिओला १९ तासांत ११ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.