scorecardresearch

पंचांवर संतप्त झालेला झ्वेरेव्ह स्पर्धेबाहेर

दुहेरीचा सामना गमावल्यामुळे रागाच्या भरात पंचांच्या खुर्चीवर रॅकेटचे फटके मारणाऱ्या जागतिक क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावरील टेनिसपटू अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हने मेक्सिको खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

एपी, एकापुल्को (मेक्सिको) : दुहेरीचा सामना गमावल्यामुळे रागाच्या भरात पंचांच्या खुर्चीवर रॅकेटचे फटके मारणाऱ्या जागतिक क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावरील टेनिसपटू अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हने मेक्सिको खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. लॉइड ग्लासपूल आणि हॅरी हेलिओव्हारा जोडीने मंगळवारी रात्री झ्वेरेव्ह आणि मार्सेलो मेलो जोडीवर ६-२, ४-६, १०-६ अशा फरकाने विजय मिळवल्यानंतर ही घटना घडली. सामना संपल्यावर प्रतिस्पर्धी जोडीशी हस्तांदोलन केल्यानंतर झ्वेरेव्हने पंचांच्या खुर्चीवर तीनदा रॅकेटने प्रहार केला आणि त्यांना उद्देशून ‘‘तुमच्यामुळे हा संपूर्ण सामना हरलो’’ अशी टीका केली. त्यानंतर आणखी एकदा खुर्चीवर रॅकेटने प्रहार केल्यानंतर धास्तावलेले पंच खुर्चीवरून खाली उतरले. मग नुकसान झालेली आपली रॅकेट प्रेक्षकांमधील पहिल्या रांगेत बसलेल्या एका मुलाकडे देऊन झ्वेरेव्हने मैदान सोडले.

‘‘मेक्सिको टेनिस स्पर्धेतील अयोग्य वर्तनामुळे अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हने स्पर्धेतून माघार घेतली आहे,’’ असे ‘एटीपी’ने म्हटले आहे. २४ वर्षीय झ्वेरेव्हने याआधीच्या स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पीटर गोजोविकला पुढे चाल देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zverev outraged referee out of competition ysh

ताज्या बातम्या